Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लेखिका प्रज्ञा पंडित ‘ समाज रत्न ‘ पुरस्काराने सन्मानित

नाशिक प्रतिनिधी -  काव्य , लेखन ,निवेदन , अध्यापन, निरूपण इत्यादी अनेक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या  कवयित्री - लेखिका - समिक्षिका प्रज्ञा म

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली सद्भावना दिवस शपथ 
खा. शरद पवारांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत
आमदारांच्या आत्रतेवर सर्वोच्च डेडलाईन

नाशिक प्रतिनिधी –  काव्य , लेखन ,निवेदन , अध्यापन, निरूपण इत्यादी अनेक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या  कवयित्री – लेखिका – समिक्षिका प्रज्ञा मनिष पंडित यांना अत्यंत  मानाच्या ” समाजरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य आयोजित  नॅशनल लायब्ररी, वांद्रे या पवित्र साहित्यिक वास्तूत    दिनांक २५ ऑगस्ट   रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाळासाहेब तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. ख.र. माळवे ( उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पर्यटन समिती ), डॉ. सुकृत खांडेकर ( संपादक दैनिक प्रहार ), डॉ. डेरिक एंजल्स ( नासा शास्त्रज्ञ ), पद्मश्री डॉ. डी.जी. यादव ( अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान संस्था, भारत सरकार ), श्री प्रमोद सूर्यवंशी ( संपादक, आम्ही मुंबईकर साप्ताहिक ) यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. 

                ‘व्यक्त- अव्यक्त ‘ या काव्यसंग्रहाद्वारे साहित्यक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या प्रज्ञा पंडित यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे रसिकांनी जोरदार स्वागत केले.  आतापर्यंत  प्रज्ञाक्षरे ,काव्यलिपी , बाबा,  मुलाखतीची गुरुकिल्ली , भारतीय खाद्यसंस्कृती अशी अठरा पुस्तके रसिकमान्य ठरलेली आहेत. ‘ इंग्रजी माझ्या खिशत’, या पुस्तकाची पन्नासावी आवृत्ती प्रकाशित झालेली असून ही पुस्तके महाराष्ट्रातील वर्ष दुर्गम भागातील शाळांमध्ये तसेच आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांना सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्तींच्या मदतीने विनामूल्य देण्यात येत आहेत. या पुस्तकाच्या 50,000 प्रतीचे वितरण महाराष्ट्रातील विविध मराठी शाळेत झाले आहे.  

 नेत्रतज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांनी ” गावोगावी  इंग्रजी माझ्या खिशात” या उपक्रमाचे कौतुक केलेले आहे. प्रा.प्रज्ञा पंडित यांनी विविध विषयांवरील  शोधनिबंध लिहिलेले आहेत. 

           ‘ तेजस्वी फाऊंडेशन ‘ ‘ प्रज्ञा स्तोत्र अध्ययन वर्ग ‘ च्या त्या अध्यक्षा असून साहित्यिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात त्या  अनेक उपक्रम  राबवत असतात. विष्णू सहस्त्रनाम तसेच सूक्त विषयावर त्या जागतिक पातळीवर तसेच स्थानिक मंदिरांमध्ये  निरूपण  करत आहेत. ठाणे येथील अन्न छत्र केंद्र, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथे विविध मदतीच्या स्वरूपात समाजसेवा करत असतात.

              ठाण्याच्या जोशी- बेडेकर कला- वाणिज्य महाविद्यालयातुन त्या अर्थशास्त्र या विषयात एम.ए. मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी एम.बी.ए.चे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

COMMENTS