Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बत्ताशावर कुस्ती खेळणार्‍या पैलवानाने हिंद केसरीची बरोबरी करू नये : ना. शंभूराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मतदार हाताच्या बोटावर मोजण्या इतका असतो. त्यामध्ये विजयी झाल्यानंतर उन्माद करण्यापेक्षा जनतेच्या मता

‘क्रिप्टो करन्सी’ चा 80 हजार डॉलरचा डिजिटल दरोडा उघडकिस आणण्यास एलसीबीला यश
निशिकांत पाटील यांच्या लाडक्या बहिणीच परिवर्तन घडवतील : सुनीता भोसले-पाटील
शाळाबाह्य मुलांना सहल घडवत इस्लामपूरमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मतदार हाताच्या बोटावर मोजण्या इतका असतो. त्यामध्ये विजयी झाल्यानंतर उन्माद करण्यापेक्षा जनतेच्या मताधिक्क्याच्या जोरावर बोला असे खडे बोल सुनावत ग्रामीण भागात लहान मुलांच्या कुस्त्या बत्ताशावर लावल्या जातात. ती कुस्ती जिकल्यानंतर लहान मुलांना जत्रेतील बत्ताशे खायला मिळतात म्हणून ते खुश होतात. ना. राणे यांनी जिल्हा बँकेची निवडणूकीत आघाडी घेतली म्हणजे बत्ताशावरील कुस्ती जिंकल्याचा त्यांना आनंद झाला आहे. अशा बत्ताशावर कुस्त्या खेळणार्‍या पैलवानाने शिवसेनेच्या नावाने खडे फोडून हिंद केसरीची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये, असा खोचक सल्ला गृहराज्य व वित्त मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते सातारा येथील शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या दोन वर्षे पुर्तीनिमित्त त्यांनी केलेल्या कामाचा आढावा देताना ना. देसाई बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान ना. देसाई यांनी त्यांच्या कार्यकक्षेत असलेल्या विभागांसाठी केलेल्या आर्थिक तरतूदीची माहिती दिली. तसेच गृहविभागाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील मसूर व मल्हारपेठ या दोन पोलीस ठाण्याच्या निर्मितीसह पोलीस वसाहतीचा प्रश्‍न मार्गी लावल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ना. देसाई म्हणाले, जिल्हा बँकेचे मतदार हे अल्प असतात. त्या निवडणूका जिंकताना काय केले जाते हे सांगण्याची गरज नाही. तरीही ना. राणे शिवसेनेच्या नावाने खडे फोडत आहेत. त्यांनी जिंकलेली ही निवडणूक म्हणजे गावातील जत्रेत लहान मुलांची बत्ताशा खायला देण्याच्या बोलीवर कुस्ती लावली जाते, अशी आहे. त्यामुळे बत्ताशावरील कुस्त्या खेळणार्‍या पैलवानाने शिवसेनेला डिवचण्याची गरज नाही. शिवसेना हिंद केसरी आहे, आणि बत्ताशावर कुस्ती खेळणार्‍या पैलवानाने हिंद केसरीची बरोबरी करू नये, असा खोचक सल्ला ना. शंभूराज देसाई यांनी दिला.

COMMENTS