Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू

https://youtu.be/r_JqVWdcWYM?si=u1GOl2vd7KJmxwG6 अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे ९ मार्च २०२६ रोजी गोळीबार होऊन गंभीर जखमी झ

अकोलेत ‘फुलोकी होली’ समारंभ उत्साहात
गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन
संजीवनी फार्मसीच्या १२ विद्यार्थ्यांना नोकरी 

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे ९ मार्च २०२६ रोजी गोळीबार होऊन गंभीर जखमी झालेल्या पैलवान सागर मोहोळकरचा (वय ३०) पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान १३ दिवसांनी मृत्यू झाला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ याला एका जत्रेत कानाखाली मारल्यामुळे चर्चेत आलेला सागर, हा नाणज गावचा रहिवासी असून, या हत्येमागे घायवळ गँगचा हात असल्याचा संशय आहे.
९ मार्च २०२६ रोजी जामखेडमधील ‘एराणी कॉलनी’ परिसरात सागरवर जवळून गोळीबार झाला होता. यात सागर मोहोळकरला हल्लेखोरांनी झाडलेल्या सहा ते सात गोळ्या सागरच्या शरीरात घुसल्या होत्या, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात व नंतर पुण्यातील ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) दाखल केले होते. शरीरात चार गोळ्या तशाच राहिल्याने, शस्त्रक्रिया करणे कठीण झाले होते आणि अखेर त्याची प्राणज्योत मावळली.
मृत सागर मोहोळकर याने काही दिवसांपूर्वी निलेश घायवळ या कुख्यात गुंडाला भर जत्रेत कानाखाली मारली होती, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून काहींना ताब्यात घेतले आहे.

COMMENTS