Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन; पुरंदर तालुक्यातील आंबळे ग्रामपंचायतीचा गजब प्रकार

आंबळे : ग्रामपंचायतीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. (छाया : सुशिल गायकवाड) नीरा /

आकांक्षा कुंभार स्टार डायमंड इंटरनॅशनल फॅशन शोमध्ये विजेती
भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अटकेसाठी मागासवर्गीयांचे दहिवडीत बोंबाबोंब आंदोलन
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी बांधला लाकडी सेतू; मोरणा विभागातील गोकुळ धावडे विद्यालयातील शिक्षकांची अनोखी शक्कल

नीरा / प्रतिनिधी : 31 मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परंतू ही जयंती साजरी करत असताना पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आंबळे ग्रामपंचायतीला राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेतील फरकच समजला नसल्याने प्रतिमा पूजनाचा अजब प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेऐवजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली.
राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती अन प्रतिमा पूजन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचे केल्याने अशी लोकं ग्रामपंचायतीत निवडून येतातच कशी काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेतील फरक ग्रामपंचायतीला कळू नये. ही खूप मोठी शोकांतिका असून हा प्रकार चक्क सरपंच यांच्या उपस्थितीत घडलेला आहे. या प्रकाराबाबत सरपंच यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली असून यापुढे असे प्रकार ग्रामपंचायतीत घडणार नाही, असा ही शब्द दिला आहे.

COMMENTS