Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र व राज्य सरकारचे पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पुरस्कृत करण्याचा वर्ल्ड पार्लमेंटचा मानस

अहमदनगर : वसुधैव कुटुंबकम म्हणजेच अवघे विश्‍वची माझे घर या उक्तीनुसार मार्गक्रमण करणारी वर्ल्ड पार्लमेंट अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्य

पैसे घेतले का विचारले म्हणून पत्नीसह जन्मदात्यांना मारहाण…
अखेर चार दिवसानंतर प्रशासनास आली जाग
सावेडीत सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

अहमदनगर : वसुधैव कुटुंबकम म्हणजेच अवघे विश्‍वची माझे घर या उक्तीनुसार मार्गक्रमण करणारी वर्ल्ड पार्लमेंट अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) नेहमी तळागाळातल्या गुणवंताना आंतरराष्ट्रीय व्यासपिठ उपलब्ध करून देत असते. सामान्य व वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही इमाने इतबारे करत असून या वेळी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा मानस डब्ल्यूसीपीएने व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्याकडून भारतातील कोणत्याही राज्याच्या तसेच भारताच्या केंद्र सरकारचा पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरवान्वीत करण्यात येणार आहे.
               सदर पुरस्कार संबंधित राज्य-केंद्र सरकारच्या पुरस्कृत व्यक्तीस काही नियम व अटींच्या अधीन राहून विनाशुल्क देण्यात येणार आहे. तरी राजकारण व गुन्हेगारी क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी आपला प्रस्ताव त्वरीत पाठवावा असे आवाहन डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे. या विशेष सोहळ्या व्यतिरिक्त राज्य व केंद्र सरकारचे कोणतेही अवॉर्ड न मिळालेल्या व आपापल्या क्षेत्रात निष्णात असलेल्या व्यक्तीही  आपले आवेदन करू शकतात. डब्ल्यूसीपीएचे सर्व निकष व नियम पाळणार्‍या गुणवंतांना वर्ल्ड पार्लमेंटचा सर्वोच्च पुरस्कार वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड 2024  देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी 17 जुलै 2024 पुर्वी आपले प्रस्ताव  ुलरिीहीळीर्रािीीसारळश्र.लेा या इमेल आयडीवर पाठवावेत व प्रस्ताव पाठविण्यापूर्वी 9096372082 या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच सदर बातमी जास्तीत जास्त गुणवंतांपर्यंत पोहचवावी. असे आवाहन डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा नामवंत पाहुण्यांच्या उपस्थितीत व हस्ते एका शानदार समारंभात होणार आहे.

COMMENTS