Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक हेपाटायटिस दिन जिल्हा प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे साजरा

नाशिक प्रतिनिधी - जागतिक हेपाटायटिस दिन जिल्हा प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी *श्

विराट -अनुष्का दुसऱ्यांदा होणार आईबाबा होणार?
शेतक-यांना ठिबक सिंचन आता ७५ आणि ८० टक्के अनुदानावर मिळणार: दादाजी भुसे
बैलपोळा निमित्त शेतकऱ्याकडून बैलाला चक्क देशी दारुचा प्रसाद

नाशिक प्रतिनिधी – जागतिक हेपाटायटिस दिन जिल्हा प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी *श्रीमती आशिमा मित्तल* जिल्हा आरोग्य अधिकारी *डॉ सुधाकर मोरे* कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य *डॉ गोविंद चौधरी* संस्थेचे  वैद्यकीय अधिकारी *डॉ कैलास भोये* यांच्या मार्गदर्शनानुसार आशा प्रशिक्षणामध्ये *जागतिक हायपिटायटिस दिन* साजरा करण्यात आला यामध्ये या आजाराविषयी सविस्तर माहिती देऊन आजाराचे सनियंत्रण करण्यासाठी लसीकरण किती महत्त्वाचे आहे हे *डॉ हिमानी चांदेकर* यांनी सर्वांसमोर विशद केले  याप्रसंगी संस्थेमार्फत हॅपेटायटिस बी आजाराचे जनजागृती पर पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले या आजाराचा प्रसार  कसा होतो, त्याचा  शरीरावर होणारा घातक परिणाम, याविषयी सर्वांना माहिती दिली या आजाराविरोधात जिल्हास्तरावर तालुक्या स्तरावर लसीकरण उपलब्ध कुठे आहे ,याविषयी माहिती देण्यात आली ,तसेच आशांमार्फत समाजामध्ये काम करत असताना हायपिटायटिस बद्दल जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे या आजाराला आपण रोखू शकतो .सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी समाजामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे असे यावेळी विशद केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री रमेश बागुल श्रीमती आरजी शिंदे,श्री सुभाष कंकरेज, श्री योगेश गायकवाड, श्रीमती शितल तेलोरे यांनी विशेष प्रयत्न केले

COMMENTS