संगमनेर ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्या

संगमनेर ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील वाणिज्य शाखेच्या सर्व प्राध्यापकांकरीता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ.पाटील म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात महाविद्यालयाने सातत्याने गुणवत्तेचे विविध उपक्रम राबवले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण व अद्यावत शिक्षण प्रणाली याकरता या महाविद्यालयात खास उपक्रम राबविण्यात येत असून अहमदनगर जिल्ह्यातील वाणिज्य शाखेच्या सर्व प्राध्यापकांकरता सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी एकदिवसीय कार्यशाळा होणार आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ पराग काळकर ,प्रा यशोधन मिठारे, प्रा.सुप्रिया पाटील, प्रा मनोहर सानप, डॉ मंगेश वाघमारे मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गायकवाड भूषवणार आहेत तर कार्यशाळेसाठी सत्र अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ गोरक्षनाथ कलापुरे, प्राचार्य डॉ सुहास निंबाळकर, डॉ विजया गुरसळ, डॉ भाऊसाहेब रणपिसे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2024 पंचवीस पासून नवीन शैक्षणिक क धोरण लागू होणार असल्याने या कार्यशाळेमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भाने सविस्तर चर्चा होणार आहे. तरी या कार्यशाळेकरता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या सर्व प्राध्यापकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील व वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा .विजय बैरागी यांनी केले आहे.
COMMENTS