Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकरा गावातील कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

आमदार आशुतोष काळेंच्या विकासाच्या भूमिकेमुळे प्रभावित

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघाचा विकास साधतांना आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील राहाता तालुक्यातील अकरा गावांना देखील कोपरगाव तालुक्यातील गावांप

इनरव्हील क्लबकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान
जिल्हा नामांतराचा निर्णय घेतला तर, त्याचे पडसाद उमटतील…

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघाचा विकास साधतांना आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील राहाता तालुक्यातील अकरा गावांना देखील कोपरगाव तालुक्यातील गावांप्रमाणे समसमान न्याय देतांना या गावातील मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे विकासाचे प्रश्‍न सोडविले आहेत. त्यामुळे रस्ते, पाणी, वीज असे मुलभूत प्रश्‍न मार्गी लागले आहे. त्यामुळे आजवर न झालेला विकास आ. आशुतोष काळे यांनी करून दाखविल्यामुळे मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी गावातील भाजप कार्यकर्ते झालेल्या विकास कामांवर प्रभवित होवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यामध्ये वाकडी (गोटेवाडी) येथील नारायण भालेराव, जालिंदर महाजन, पाराजी महाजन, भीमराव कापसे, संदीप शिंदे, बाळासाहेब सावंत, संजय महाजन, भारत महाजन, गणू शिंदे, मच्छिंद्र महाजन, विलास म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, रावसाहेब सदाफळ, योगेश माघाडे या भाजपच्या कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अण्णासाहेब कोते, भाऊसाहेब आहिरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.मागील काही दिवसांपासून भाजपचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरात देखील राजकीय भूकंप होवून कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्षासह, नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हे लोन आता मतदार संघातील राहाता तालुक्यातील अकरा गावात पसरले आहे. त्यामुळे वाकडी (गोटेवाडी) च्या भाजपच्या कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून यापुढील काळात देखील अनेक कार्यकर्ते कोल्हे गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.

COMMENTS