करहर : भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रवीण दरेकर, तानाजी भिलारे, सयाजी शिंदे, श्रीहरी गोळे व इतर. करहर येथे जनसंपर्क कार्यालय उद्घ
करहर येथे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन
करहर / वार्ताहर : कार्यकर्ता हे पक्षाचे बलस्थान आहे. या करिता कार्यकर्त्यामध्ये मिसळून स्वतः कार्यकर्ता झाले तर कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन पक्षकार्य जोमात होते. याच माध्यमातून गावोगावच्या भाजपच्या जनसंपर्क कार्यालयातून लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन सोडविण्यास प्राधान्यकर्म दिला जात आहे, असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले.
करहर, ता. जावळी येथे भाजपाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीहरी गोळे, तालुका अध्यक्ष, रवी परामने, माजी सभापती, भाजप, सयाजी शिंदे, जिल्हा सरचिटणीस, तानाजी भिलारे, किरण भिलारे, तालुका उपाध्यक्ष, भानुदास ओंबळे, गणेश पार्टे, ता. सरचिटणीस, प्रदीप बेलोशे, ता. सरचिटणीस, भाईजी गावडे, प्रमिला गोळे, सरपंच हातगेघर, विनोद वेंदे शहर अध्यक्ष मेढा, प्रमोद शिंदे, मोनिका परामने, युवती मोर्चा, शंकर गोळे, उपसरपंच, रोहिदास भालेघरे मान्यवर उपस्थित होते.
प्रवीण दरेकर म्हणाले, मी स्वतः प्रथम कार्यकर्ता असून कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देत आहे. जनसंपर्क कार्यालयातून लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविणे अपेक्षित आहेत. याकरिता काही मदत लागल्यास मी स्वतः आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन. भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेती, पिण्याच्या पाण्याची दुरवस्था, घरांची, रस्ते पडझड याबाबत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या कानावर घालून सरकार दरबारी पाठपुरावा करावा अशी गळ घातली. दरेकरांनी या प्रश्नी लक्ष घाल्याची आश्वासन दिले.
विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांनी भेटीदरम्यान महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांची घेतलेली भेट या संदर्भात छेडले असता. आमची शालेय मैत्री असल्याने मित्राला भेटलो यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे नमूद केले. यावेळी करहर पंचक्रोशीतील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS