वाशी ः वाशी येथे नवीन पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान तिसर्या मजल्यावरून खालीपडून एका कामगाराचा मृत्यू झाला. सदर बांधकाम सुरु असलेल्या ठिकाण

वाशी ः वाशी येथे नवीन पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान तिसर्या मजल्यावरून खालीपडून एका कामगाराचा मृत्यू झाला. सदर बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सेफ्टी जाळी नव्हती. त्यामुळे खाली कोसळून कामगाराचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाण्यात सेफ्टी ऑफिसर आणि सब कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या प्रकरणातून मनपा अधिकारी आणि मुख्य कंत्राटदाराला जाणीवपूर्वक वाचविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कामगाराच्या मृत्यूनंतर अन्य कामगारांनी हळहळ व्यक्त केली. मृत कामगाराच्या कुटुंबियांकडून देखील आक्रोश आणि संताप व्यक्त केला जात आहे.
COMMENTS