कल्याण प्रतिनिधी - जो पर्यंत ई फाइलिंग संदर्भात नवीन नियमावली येत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा. मुंबई उच्च न्यायालय यांन

कल्याण प्रतिनिधी – जो पर्यंत ई फाइलिंग संदर्भात नवीन नियमावली येत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा. मुंबई उच्च न्यायालय यांनी 31 मार्च 2023 पर्यंत ई-फायलिंग सक्ती केली असून न्यायालय मध्ये काम करणाऱ्या वकिलांकडे लॅपटॉप स्कॅनर प्रिंटर नेट सुविधा व इतर वस्तू नसल्याने न्यायालयीन काम करणाऱ्या वकिलांना नाहक त्रास होत असून माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात आता वकील संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना तर्फे न्यायालीन कामकाज बंदची हाक देत आज दुपारपासून कल्याण न्यायालयामध्ये वकील आणि काम बंद आंदोलन केले असून ई-फायलिंग सक्तीची न करता ऐच्छिक ठेवून पूर्वीप्रमाणेच केस दाखल करून घ्याव्यात अशा प्रकारच्या मागण्या करत जोपर्यंत सुधारित आदेश येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या वकील संघटनेकडून देण्यात आले आहे.
COMMENTS