Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 दिल्ली येथे केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांची कार्य तत्परता

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथिल तरुण कै.ऋषिकेश सुभाष वराडे वय वर्षे 24

औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगतीमार्ग बांधण्याची नितीन गडकरी यांची घोषणा
घराणे शाही चालू देणार नाही – प्रकाश आंबेडकर 
कृषीमंत्री सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथिल तरुण कै.ऋषिकेश सुभाष वराडे वय वर्षे 24 हा वैश्नौदेवी च्या दर्शनाला गेला होता. प्रवासादरम्यान अल्पश्या आजाराने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी तात्काळ त्याचा मृतदेह घरी पोहचवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करुन दिल्ली येथून कर्नाटका एक्सप्रेस ने भुसावळ पर्यंत पाठवण्याची व्यवस्था केली. स्वतः तिथे हजर राहून ऋषीकेश च्या सोबतच्या मित्रांना सोबत चर्चा करून आणि कुटूंबियांना फोनवर संपर्क साधून धिर दिला. मी ही स्वतः इतर तरुण रेल्वे स्टेशनवर उपस्थित होतो मतदारसंघातील नागरिकांची सुरक्षेसाठी तत्परता राहण्याबद्दल संवेदनशील मंत्री श्री दानवे यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

COMMENTS