Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शामगाव येथे लोकसहभागातून महिला कुस्ती संकुल

कराड / प्रतिनिधी : कुस्तीप्रेमींनी एकत्रित येत शामगाव (ता. कराड) जवळील रायगावमध्ये लोकसहभाग व परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने सुमारे एक कोटी रुपय

‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ ला वामनदादा कर्डक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
संवादातून वाद सोडवून संघर्ष टाळावा : प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. जे. धोटे
कराड येथील 25 घरांना आग; सिलेंडर स्फोटाने शहर हादरले

कराड / प्रतिनिधी : कुस्तीप्रेमींनी एकत्रित येत शामगाव (ता. कराड) जवळील रायगावमध्ये लोकसहभाग व परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे मुलींसाठी मुलींनी पुढाकार घेऊन विकास नावाचे महिला कुस्ती संकुल उभारले आहे. त्याद्वारे महाराष्ट्र व भारतासाठी असामान्य दर्जाच्या महिला कुस्तीगीर बनवायच्या आहेत, अशी माहिती कुस्ती संकुलाच्या संस्थापक व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पै. कौशल्या वाघ-पाटील यांनी येथे दिली.
येथील राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनास त्या येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कुस्ती संकुलाची माहिती दिली. पै. वाघ-पाटील म्हणाल्या, महिला कुस्ती संकुलात महिला पैलवानांसाठी सकस आहार, उत्तम निवास व्यवस्था, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, नैसर्गिक वातावरणात पाल्यांचा सर्वांगीण विकास व क्रीडा कौशल्याच्या वाढीवर भर, योगासने, संरक्षणाचे धडे व करिअर विषयक मार्गदर्शन केले जात आहे.
पै. वाघ-पाटील या महाराष्ट्राची पहिल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक मिळवणार्‍या राज्यातील महिला आहेत. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सलग पाच वेळा सुवर्ण धडक मारली आहे. नॅशनलला सलग 14 पदके मिळवण्याचा मान मिळवला. पुरुष मल्लाशी तब्बल 45 मिनिटे लढाही त्यांनी दिला आहे.
कौशल्या यांच्यासाठी आई-वडील व भावाने खूप हाल-अपेष्टा सोसून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीगीर बनवले. 48 किलो वजन गटात कौशल्या सलग पाच वेळा नॅशनल चॅम्पियन ठरल्या. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी सलग 12 पदकांची कमाई केली. दोन्ही गुडघे आणि खांद्यावर एकूण पाच मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. कौशल्या यांच्या अंगी असलेले कौशल्य व कुस्तीची वाघिणीची मजबूत पकड हा त्यांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. महिला कुस्ती संकुलासाठी खा. संजय पाटील, माजी मंत्री आ. विश्‍वजित कदम, आ. अरुण लाड, संग्राम देशमुख, आ. पृथ्वीराज देशमुख यांनी सहकार्य केले.

COMMENTS