Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्टेट बँकेच्या शाखेत महिलांची चेंगराचेंगरी

नंदूरबार ः जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक  शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला आहे. या चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध पडल्या असून त्या

विदेशी गुंतवणूकीचे तकलादू धोरण
शिवडी न्यायालयाकडून खा. नवनीत राणांचे वडील फरार घोषित
बसच्या गर्दीत वकिलाचे पैशांचे पाकीट मारले

नंदूरबार ः जिल्ह्यातील धडगाव स्टेट बँक  शाखेत महिलांची चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला आहे. या चेंगराचेंगरीत दोन महिला बेशुद्ध पडल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ई केवायसीसाठी बँकेत महिलांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. भर पावसात बँकेसमोर एक ते दोन किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. यात गर्दीमध्ये दोन महिलांची प्रकृती खराब झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS