Homeदखल

महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये अवतरले महिला-राज !

महाराष्ट्रात जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत महिलांचे प्रतिनिधित्व अत्यंत लक्षणीय राहिले आहे. राज्याच्या ५०% महिला आरक

निवडणूक आयोगाकडून जनतेची दिशाभूल
नांदेड महानगरपालिकेच्या 20 प्रभागांसाठी 41.65 टक्के मतदान
मुंबई जिंकली, पण महापौर कोण? भाजप-शिंदे सेनेत पडद्यामागे हालचाली सुरू
महाराष्ट्रात जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत महिलांचे प्रतिनिधित्व अत्यंत लक्षणीय राहिले आहे. राज्याच्या ५०% महिला आरक्षणाच्या धोरणामुळे सर्वच महानगरपालिकांमध्ये महिला नगरसेविकांची संख्या मोठी आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार आणि प्रमुख शहरांच्या निकालांनुसार महत्त्वाच्या महानगरपालिकांमधील महिला नगरसेविका
नागपूर महानगरपालिका एकूण जागा १५१ आहेत. या महापालिकेत ज्या पक्षाकडे ७५ जागा असतील त्यांची बहुमताची सत्ता बनेल. आश्चर्य असे की, सर्व पक्षांच्या महिला नगरसेविका एकत्र आल्या तरी त्यांची सत्ता स्थापन होऊ शकते; कार महिला नगरसेविका नागपूर महानगरपालिकेत ७८ एवढ्या संख्येने निवडून आल्या आहेत. येथे महिलांनी पुरुषांनाही मागे टाकले आहे. सध्या नागपूर महानगरपालिकेत ७८ महिला नगरसेविका आहेत; तर, ७३ पुरुष नगरसेवक आहेत. तीच स्थिती मुंबई महापालिकेत देखील आहे. एकूण २२७ नगरसेवक असणाऱ्या या महापालिकेत ११४ एवढे नगरसेवक ज्या पक्षाकडे असतील त्यांचा महापौर बनेल. मात्र, मुंबई महापालिकेत महिला नगरसेविकांची संख्या ११४ पेक्षा जास्त आहे. ११४ जागा महिलांसाठी आरक्षित होत्या, त्याव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातूनही महिला निवडून आल्या आहेत. पुणे महापालिकेत एकूण १७४ नगरसेवक आहेत. एकूण १७४ जागांपैकी ८७ जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. यातही आपल्याला स्पष्ट दिसते की, येथेही खुल्या जागेवरून ही महिला नगरसेविका निवडून आल्याने महिलांची थेट सत्ता स्थापन होऊ शकते. नवी मुंबई महानगरपालिका एकूण १११ नगरसेवकांची आहे. येथेही ५६ नगरसेवक जिकडे असतील त्यांचा महापौर बसू शकतो. आरक्षित ५६ जागांवरून महिला निवडून आल्या आहेत. आरक्षणाच्या मर्यादेपेक्षा जास्त महिला निवडून आल्याचे प्राथमिक चित्र सर्वत्र आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार एकूण जागांपैकी ५०% जागा महिलांसाठी आरक्षित असतात. त्यामुळे २९ महानगरपालिकांच्या एकूण २,८६९ जागांपैकी १,४३५ महिला नगरसेवकाच्या जागा आरक्षित होत्या. तेवढ्या महिला तर निवडून आल्या आहेतच; पण, खुल्या जागांवर देखील महिला निवडून आल्याने महाराष्ट्रातील महानगरपालिकेत महिला नगरसेविका बहुमताने आहेत. या महिला नगरसेविका जर एकत्र आल्या तर कोणत्याही राजकीय पक्षाऐवजी महिला वर्गाची सत्ता बहुमताने स्थापन होऊ शकते. नागपूरसारख्या शहरात आरक्षित जागांच्या (७६) पलीकडे जाऊन इतर महिलांनी खुल्या प्रवर्गातून पुरुषांचा पराभव करत विजय मिळवला आहे. भाजप, शिवसेना (दोन्ही) आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये महिला उमेदवारांच्या विजयाचे प्रमाण मोठे आहे. एकट्या भाजपच्या एकूण १,३७२ विजयी उमेदवारांपैकी सुमारे ५०% पेक्षा जास्त महिला आहेत. सध्या काही ठिकाणी पोटनिवडणुका किंवा अंतिम प्रभागांची अधिकृत यादी प्रसिद्ध होण्याची प्रक्रिया सुरू असल्याने, संपूर्ण राज्यातील २९ महानगरपालिकांची ‘एकूण एकत्रित’ निश्चित संख्या राज्य निवडणूक आयोगाच्या अंतिम अहवालानंतर अधिक स्पष्ट होईल. छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकेत एकूण १२६ प्रभाग आहेत. नियमानुसार ६३ जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. यंदाच्या निवडणुकीत काही महिलांनी खुल्या प्रवर्गातूनही निवडणूक लढवून विजय मिळवला आहे, त्यामुळे महिला नगरसेविकांची एकूण संख्या ६३ च्या वर गेली आहे.
विशेषतः नवीन विस्तारित भागात महिला उमेदवारांना मतदारांनी मोठा कौल दिला आहे. अमरावतीमध्ये एकूण ९८ जागांसाठी मतदान झाले. त्यापैकी ४९ जागा महिलांसाठी राखीव होत्या. येथे स्थानिक आघाड्या आणि अपक्ष महिला उमेदवारांनी आरक्षित जागांच्या पलीकडे जाऊन चांगली कामगिरी केली आहे. अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढतीत महिला उमेदवारांनी अनुभवी पुरुष उमेदवारांचा पराभव केला आहे. एकंदरीत, सर्वच महापालिकांमध्ये ५० टक्केच्या वर महिला नगरसेविका निवडून आल्याने, महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये महिला राज खऱ्या अर्थाने अवतरले आहे!

COMMENTS