Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूरमध्ये आजपासून महिला हॉकी स्पर्धेचे आयोजन

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अंतर विभागीय महिला हॉकी स्पर्धेचे संयोजन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर यांच्याकडे दरवर्षी मह

बळीराजाची पहिली ऊस परिषद : ऊसाला प्रतिटन 4 हजार रूपये द्या अन्यथा ऊसतोड नाही
बारामती परिमंडळात 106 कोटींची वीजबिल थकबाकी
सातार्‍यात मद्य विक्रीच्या धोरणास ‘अंनिस’चा विरोध

इस्लामपूर / प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अंतर विभागीय महिला हॉकी स्पर्धेचे संयोजन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर यांच्याकडे दरवर्षी महाविद्यालयामध्ये हॉकीच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. याही वर्षी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अंतर विभागीय महिला हॉकी स्पर्धेचे आयोजन शिवाजी विद्यापीठाकडून 8 व 9 ऑक्टोंबर रोजी खा. एस. डी. पाटील क्रीडांगणावर करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूरमधील विद्यापीठाच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयातून महिला संघ सहभागी होणार आहे. स्पर्धा दोन दिवस चालणार असून याचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य व हॉकीचे राष्ट्रीय हॉकी खेळाडू संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. हेमंतकुमार नारायणकर व प्रा. संदीप पाटील हे करत आहेत.
स्पर्धेकरिता संस्थेचे मानद सचिव अ‍ॅड. बी. एस. पाटील व सहसचिव अ‍ॅड धैर्यशील पाटील आमच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होणार आहेत. तसेच संजय कबूरे, संजय चरपले, संजय चव्हाण, राजेंद्र खंकाळे, सुहास पाटील, ताहीर शेख, लाला जाधव, एस. बी. जाधव, सुरज काळे या सर्वांच्या सहकार्यातून या स्पर्धा होणार आहेत.

COMMENTS