Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजारामबापू कारखान्यातर्फे ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणास महिला रवाना

इस्लामपूर / प्रतिनीधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने व्हीएसआय,मांजरी बुद्रुक (पुणे) या शिखर संस्थेतील आयोजित ऊस शेती ’ज्ञा

शहीद जवान वैभव भोईटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; विकणार्‍यासह खरेदी करणारे सातारा जिल्ह्यातील तिघे अटकेत
कार्यालय ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस चे आज ठिय्या आंदोलन

इस्लामपूर / प्रतिनीधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने व्हीएसआय,मांजरी बुद्रुक (पुणे) या शिखर संस्थेतील आयोजित ऊस शेती ’ज्ञानलक्ष्मी’ प्रशिक्षणास कारखाना कार्यक्षेत्रातील 5 महिला शेतकरी पाठविण्यात आले. त्यांना निरोप देताना वाळवा बक्षारचे अध्यक्ष रामचंद्र जाखलेकर, केन अकाउंटंट जयकर फसाले, दिलीप पाटील, संतोष जंगम, अमोल कदम प्रामुख्याने उपस्थित होते.
इस्लामपूरच्या सौ. गितांजली राजाराम पाटील, मसुचीवाडीच्या सौ. सुरेखा शंकर कदम, आष्ट्याच्या सौ. शैलजा दिलीप सुतार, ऐतवडे बुद्रुकच्या सौ. संगिता रामचंद्र गायकवाड, वाळवाच्या सौ. अनिता अमित कोले या महिला शेतकर्‍यांना चार दिवसाच्या अद्यावत प्रशिक्षणास पुण्यास पाठविण्यात आले. महिलांना या चार दिवसात ऊस लागण तंत्रज्ञान, सेंद्रीय खते, रोग किडी, माती परिक्षणाचे महत्त्व, आधुनिक ठिंबक सिंचन प्रणाली वापर, रासायनिक खतांचा समतोल वापर, ऊसाच्या नवनवीन जाती, एकात्मिक किड व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर, खोडवा ऊस व्यवस्थापन, रुंद सरी, जोड ओळ ऊस लागण पध्दती यावरती मार्गदर्शन संबंधित विषयाचे तज्ञ करणार आहेत. याप्रसंगी अविनाश खोत, प्रकाश मगदूम, शंकर कदम, किरण बाबर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS