शेवगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेवगाव तालुक्यातील ‘लाडक्या बहिणीं’नी माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडेंच्या पुढाकाराने एकत्रित येत तालुक्याचे धाकटे शिखर शिंगणापूर असलेल्या माळेगावच्या महादेव मंदिरातील भगवान महादेवाला अभिषेक घालून दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. यावेळी माजी जि.प.सदस्य हर्षदा काकडे, विमल सातपुते, देवडे नानी, रुक्मणी रुईकर, पद्मा भापकर, साखरबाई औटी, नंदा लोंढे, सुनंदा औटी, मीना ढाकणे, केशर बोडखे, मीनाताई डावरे, मालन लबडे, सुभद्रा बोडखे, कलाबाई घोरपडे, सुमन घोरपडे, सुनीता ढाकणे, स्वाती धायगुंडे, सुमन गावडे, नंदा गावडे, मनीषा भालेराव यांसह शेकडो महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना काकडे म्हणाल्या की, नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याने शिंदे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचे कुठलेही नियोजन नव्हते. परंतु आपल्या बहिणीं’चे लाडके भाऊ शिंदे यांना दीर्घ दीर्घायुष्य लाभावे या हेतूने आम्ही सर्वांनी एकत्रित येत सोमवारच्या पार्श्वभूमीवर महादेवाच्या मंदिरामध्ये अभिषेक व जप केला. तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावांसाठी ताजनापूर लिफ्टचे पाणी मिळावे याकरिता चापडगावला पाणी चाचणी झालेली असून उर्वरित गावांसाठीची पाणी चाचणी घेण्यात यावी, माळेगाव-ने व परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी द्यावे तसेच वरूर-आखेगावसह १३ गावांच्या पाणी योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना साकडे घालणार आहोत. यावेळी ऍड.शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, नामदेव ढाकणे, रामकिसन घनवट, राजेंद्र भिसे, रामजी पोटफोडे, सुनील दारकुंडे , एकनाथ ढाकणे, वीर भाऊसाहेब, सरपंच रामनाथ भालेराव आदींसह नागरिक उपस्थित होते.प्रास्ताविक जगन्नाथ गावडे यांनी तर आभार देवस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब वाकडे यांनी मानले.

शेवगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेवगाव तालुक्यातील ‘लाडक्या बहिणीं’नी माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडेंच्या पुढाकाराने एकत्रित येत तालुक्याचे धाकटे शिखर शिंगणापूर असलेल्या माळेगावच्या महादेव मंदिरातील भगवान महादेवाला अभिषेक घालून दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. यावेळी माजी जि.प.सदस्य हर्षदा काकडे, विमल सातपुते, देवडे नानी, रुक्मणी रुईकर, पद्मा भापकर, साखरबाई औटी, नंदा लोंढे, सुनंदा औटी, मीना ढाकणे, केशर बोडखे, मीनाताई डावरे, मालन लबडे, सुभद्रा बोडखे, कलाबाई घोरपडे, सुमन घोरपडे, सुनीता ढाकणे, स्वाती धायगुंडे, सुमन गावडे, नंदा गावडे, मनीषा भालेराव यांसह शेकडो महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना काकडे म्हणाल्या की, नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याने शिंदे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचे कुठलेही नियोजन नव्हते. परंतु आपल्या बहिणीं’चे लाडके भाऊ शिंदे यांना दीर्घ दीर्घायुष्य लाभावे या हेतूने आम्ही सर्वांनी एकत्रित येत सोमवारच्या पार्श्वभूमीवर महादेवाच्या मंदिरामध्ये अभिषेक व जप केला. तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावांसाठी ताजनापूर लिफ्टचे पाणी मिळावे याकरिता चापडगावला पाणी चाचणी झालेली असून उर्वरित गावांसाठीची पाणी चाचणी घेण्यात यावी, माळेगाव-ने व परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी द्यावे तसेच वरूर-आखेगावसह १३ गावांच्या पाणी योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना साकडे घालणार आहोत. यावेळी ऍड.शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, नामदेव ढाकणे, रामकिसन घनवट, राजेंद्र भिसे, रामजी पोटफोडे, सुनील दारकुंडे , एकनाथ ढाकणे, वीर भाऊसाहेब, सरपंच रामनाथ भालेराव आदींसह नागरिक उपस्थित होते.प्रास्ताविक जगन्नाथ गावडे यांनी तर आभार देवस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब वाकडे यांनी मानले.

COMMENTS