Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन

अकोले/प्रतिनिधी ः जागतिक ग्राहक दिनानिमित्त अकोल्यातील तहसील कार्यालयात बुधवार 15 मार्च सकाळी 12 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहि

शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीची मुसंडी
मनपा करणार एका प्रभागात मीटरद्वारे पाणीपुरवठा ; यंदाचे अंदाजपत्रक 802 कोटींचे, नवी करवाढ नाही
आरक्षणप्रश्‍नी मराठा आंदोलक आक्रमक

अकोले/प्रतिनिधी ः जागतिक ग्राहक दिनानिमित्त अकोल्यातील तहसील कार्यालयात बुधवार 15 मार्च सकाळी 12 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्राहकपंचायत महाराष्ट्रचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी दिली. या मेळाव्यात ग्राहकांच्या विविध क्षेत्रातील तक्रारींचे निवारण करण्यात ग्राहक पंचायत अकोले पुढाकार घेणार असून संबंधित अधिकारी व ग्राहक यांच्यासमोर समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे दत्ता शेणकर, रमेश राक्षे, महेश नवले यांनी स्पष्ट केले. मच्छिंद्र मंडलिक म्हणाले ग्राहक दिनांत यापूर्वी अनेक ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न ग्राहक पंचायतच्या वतीने केला गेलेला आहे.
अकोले हा आदिवासी तालुका आहे. तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे. अनेक शासकीय विविध दाखले रेशन पुरवठा, वीज पुरवठा, शहरी व ग्रामीण भागात गॅस पुरवठा, बी-बियाने, औषधे, कृषी खाते, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, आदिवासी आश्रम शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण व इतर सुविधा मिळत नाही, सिटी सर्वे कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, दलालबाजी, आधारसेतू कार्यालय, वन खाते, पशुसंवर्धन, पंचायत समिती, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन, राजूर प्रकल्प कार्यालय, जीवन प्राधिकरण कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक, सार्वजनिक बांधकाम, बालविकास प्रकल्प, मार्केट कमिटी, वजन काटे, बँका व अनेक दैनंदिन कामांतील अडचणींची सोडवणूक यावेळी करण्यात येणार आहे. अधिकारी व ग्राहक यांच्यासमोर ही सोडवणूक केली जात असल्यामुळे ग्राहकांनी आपल्या तक्रारी तोंडी, लेखी व पुराव्यानिशी मांडाव्या व मेळाव्यास उपस्थित राहावे असे आव्हानही त्यांनी केली आहे. तहसीलदार सतीश थेटे, नायब तहसिलदार टी. डब्लु.महाले, महसूलचे नायब तहसीलदार डबाळे, पुरवठा निरीक्षक रसिक सातपुते, पुरवठा लिपिक, दत्तात्रय कोल्हाळ, मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेणकर, रमेश राक्षे, महेश नवले, प्रा.डॉ.सुनील शिंदे, सिताराम भांगरे, अ‍ॅड. दीपक शेटे, अ‍ॅड. राम भांगरे आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. ग्राहकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आव्हान माधवराव तिटमे, रामहरी तिकांडे, रामदास पवार, भाऊसाहेब गोर्डे, राजेंद्र घायवट, गंगाराम धिंदळे, धनंजय संत, शब्बीर शेख, मच्छिंद्र चौधरी आदींनी केले आहे.

COMMENTS