गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणार्‍या महिला पकडल्या…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणार्‍या महिला पकडल्या…

अहमदनगर/प्रतिनिधी : बस स्टॅण्ड वा सार्वजनिक ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी महिलांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने पकडली. ही

आत्मकेंद्री लोकशाहीमुळे अनागोंदी व भ्रष्टाचार पोसला गेल्याचा आरोप
कर्जत व पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ६० लाखांची रोकड केली हस्तगत
साईसंस्थानला आरटीपीआर लॅबसह ऑक्सिजन प्लान्ट करण्याचे आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी : बस स्टॅण्ड वा सार्वजनिक ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी महिलांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने पकडली. ही कारवाई नेवासा तालुक्यातील देवगड येथे केली. 1 ऑक्टोबर 2021 रोजी सौ. नंदा बापु थोरात (वय 36,रा.चांदेवाडी, फत्तेबाद,ता.श्रीरामपूर) या नेवासे येथून श्रीरामपूर येथे जाण्यासाठी नेवासा एसटी स्टॅण्ड येथून बसमध्ये बसत असताना त्यांच्या पाठीमागून बसमध्ये येणार्‍या दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेवून थोरात यांनी पर्समधील 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस व नथ चोरुन नेले होते. या घटने बाबत नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करताना अशा चोर्‍या करणार्‍या महिलांची टोळी पोलिसांनी पकडली.
देवगड येथे दत्तजयंती उत्सवामध्ये काही महिला गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्यासह पोलिस हवालदार दत्ता गव्हाणे, मनोज गोसावी, पोलिस नाईक ज्ञानेश्‍वर शिंदे, शंकर चौधरी, संदीप दरदंले, संतोष लोढे, महिला पोलिस नाईक सोनाली साठे, सारीका दरेकर यांनी तसेच नेवासा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक चौधरी, पोलिस हवालदार तमनर, पोलिस नाईक झांबरे, केदार व महिला पोलिस नाईक सविता उंदरे यांनी देवगडला गर्दीत सापळा रचून चार महिलांना ताब्यात घेतले. गीता संतोष बन्सी (वय 40, रा. मांगवाडा, ता. श्रीरामपूर), मनीषा योगेश रोकडे (वय 22,रा.वॉर्ड नं.2,ता.श्रीरामपूर), रंजना शंकर गायकवाड (वय 50, रा. वॉर्ड नं.2, ता.श्रीरामपूर) व कांचन संजय हातांगळे (वय 40, रा.वॉर्ड नं. 2, ता.श्रीरामपूर) या पकडलेल्या महिलांकडे चोरीच्या गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्या उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्या, त्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता चोरीचा गुन्हा त्यांनी मिळून केल्याची कबुली दिल्याने त्यांची महिला पोलिस कर्मचारी यांनी अंगझडती घेतली असता त्यामध्ये 10 हजार रुपये रोख रक्कम मिळाली. महिला आरोपी गायकवाड हिच्याविरुद्ध यापूर्वी कोतवाली व दौंड रेल्वे पोलिसात चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत.

COMMENTS