Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हिडिओ कॉल व्हायरलची धमकी देत महिलेवर बलात्कार

आरोपीवर जामखेड पोलिस स्टेशला गुन्हा दाखल

जामखेड ः तू माझ्यासोबत चल, तू माझ्यासोबत राहा, अन्यथा मी तुझ्या सोबत केलेले व्हाट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करेल, अशी धमकी देऊन 20 वर्

जिल्ह्यात बाजारपेठा, आठवडेबाजार व धार्मिक स्थळांसह विवाहांवरील बंदी का
Parner : उपोषणास बसलेल्यांवर कारवाईची टांगती तलवार l LokNews24
शिरसगावमध्ये महात्मा बसवेश्‍वर व कर्मवीरांना अभिवादन

जामखेड ः तू माझ्यासोबत चल, तू माझ्यासोबत राहा, अन्यथा मी तुझ्या सोबत केलेले व्हाट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करेल, अशी धमकी देऊन 20 वर्षीय महिलेस मारहाण करून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी एक जणाविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी मनोज भगवान अब्दुले वय 40 वर्षे, रा. सदाफुले वस्ती, जामखेड याची मे 2024 रोजी पिडीत महीलेसोबत ओळख झाली होती. त्यामुळे आरोपी आणि महीलेचे फोनवर बोलाने चालु झाले. यानंतर काही महीन्यांनी आरोपी हा पिडीत महीलेला आपण लग्न करु असे म्हणत होता. मात्र महीलेचे पुर्वी लग्न झाले होते. ती सहा महीन्यांपासून आपल्या वडील व भावाकडे रहात होती. तसेच तिचा पहील्या पतीपासुन घटस्फोट झाला नव्हता त्यामुळे पिडीत महीलेने आरोपी सोबत लग्न करणास नकार दिला. यानंतर अनेक वेळा आरोपी मनोज अब्दुले हा पिडीत महीलेकडे येऊन लग्न करण्यासाठी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. जुलै 2024 मध्ये चौथ्या आठवड्यामध्ये दोन वेळा पिडीत महीलेवर आरोपीने महिलेची इच्छा नसताना बळजबरीने अत्याचार केला. 1 ऑगस्ट 2024 रोजी महीलेस रस्त्यावर आडवुन तु माझ्या सोबत चल असे म्हणाला त्यावेळी तिने नकार देताच त्याने शिवीगाळ करत मारहाण केली तसेच तु माझ्यासोबत आली नाही तर मी तुझे सोबत झालेले व्हीडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करुन तुझी बदनामी करेल असे म्हणाला. तसेच सदरचे व्हॉटसप व्हीडिओ कॉल रेकॉर्डींग पिडीत महीलेच्या भावाच्या मोबाईल मध्ये पाठवुन देखील तिची बदनामी केली.या प्रकरणी दि 18 आँगस्ट रोजी पिडीत महीला, वय 20 वर्षे हीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मनोज अब्दुले याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.

COMMENTS