पुणे ः पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथे एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा तिच्या राहत्या घरात खून झाल्याची घटना उघडकीस आ

पुणे ः पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बावधन येथे एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा तिच्या राहत्या घरात खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बावधान येथील विंड विल सोसायटी या ठिकाणी मध्यरात्री ही घटना घडली आहे. खून झालेल्या महिलेवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. आशा महेंद्र जैन असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत तिचा पती महेंद्र हा देखील गंभीर जखमी झाला आहे. आशा जैन या पती महेंद्र, मुलगी आणि जावई यांच्य सोबत विंड विल सोसायटीमध्ये राहत. त्यांच्यावर कोयत्याने वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील संशयित म्हणून पोलिस हे महेंद्र जैन यांची चौकशी करणार आहेत.
COMMENTS