Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात शॉक लागून महिलेचा मृत्यू

पुणे : राज्यात पावसाचा चांगलाच जोर वाढला असून, पुण्यात तर पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात चांगलाच पाऊस झाला होता. या पावसात प

गौतमी पाटीलचे सिंधुदुर्गमधील कार्यक्रम रद्द
चाकूचे वार करत तरुणाची निर्घृण हत्या | LOKNews24
निळवंडेतून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी

पुणे : राज्यात पावसाचा चांगलाच जोर वाढला असून, पुण्यात तर पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात चांगलाच पाऊस झाला होता. या पावसात पुण्यात पूर आला होता. तेव्हा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. आता याच पावसाने एका महिलेचा करुण अंत झाला आहे. विद्युत वायरचा शॉक लागून या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली असून मृत महिलेचे वय 40 वर्षे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेली महिला कोंढवा परिसरात राहायला होती. दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. दरम्यान, पाऊस कमी झाल्यानंतर ही महिला बाहेर पडली होती होती. मात्र या परिसरात अशलेल्या डीपीमधून विद्युत तारा बाहेर आल्या होत्या. या तारा रस्त्यावर साठलेल्या पाण्यात आल्या होत्या. परिणामी संपूर्ण परिसरात विद्यूत प्रवाह पसरला होता. याची मृत महिलेला कल्पना नव्हती. परिणामी घराबाहेर आल्यानंतर पाण्यातील तारा महिलेला दिसल्या नाहीत. या तारांचा स्पर्श महिलेला झाला. परिणामी विद्युत तारांच्या झटक्यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डीपीच्या तारा बाहेर आल्या होत्या तर या परिसरातील प्रशासनाने त्याची दखल का घेतली नाही? डीपीची दुरुस्ती करण्यास विलंब का लावला? असे अनेक प्रश्‍न स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

COMMENTS