कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील माहेर असलेली व वडाळी ता.निफाड येथील सासर असलेली आदिवासी महिला रेणुका किरण गांगुर्डे (वय-२०
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील माहेर असलेली व वडाळी ता.निफाड येथील सासर असलेली आदिवासी महिला रेणुका किरण गांगुर्डे (वय-२०) हि बाळंतपणासाठी चासनळी येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचारार्थ आली असता त्या ठिकाणी ना कोणी डॉक्टर होते ना कोणी अन्य व्यक्ति त्यामुळे सदर महिलेचा अतिरक्त स्राव होऊन तीचा मृत्यु ओढवला असल्याने आपल्या कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात काल मध्यरात्री १२.३० वाजता डॉ.साहिल खोत,डॉ.साक्षी सेटी यांचेसह रुग्णवाहिका चालक संजय शिंदे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”प्राथमिक आरोग्य केंद्र हे भारतातील आरोग्यसेवेच्या उतरंडीतील सर्वात खालचे केंद्र आहे.देशातील दूरवरच्या भागातील मनुष्यवस्तीपर्यंत किमान आरोग्य सुविधा पोचविण्याच्या उद्देशाने भारतातील मध्यवर्ती सरकारच्या धोरणानुसार.प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे विणण्यात आले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि परिचालनाबाबतचे सर्व निर्णय मात्र राज्य सरकारांची आरोग्य खाती घेतात.प्राथमिक आरोग्य केंद्र साधारणतः सहा उपकेंद्रांसाठी एक रेफरल युनिट म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र काम करते.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आरोग्य अधिकारी व त्याच्या सहाय्यासाठी १४ निमवैद्यकीय व इतर कर्मचारी असतात.प्राथमिक आरोग्य केंद्र हे २४ तास सेवा देते.मात्र हि केंद्रे जनतेच्या उपयोगीच पडली नाही तर अशा प्रसंगी जी नागरिकांची दुरावस्था ओढवते त्याचे दुर्दैवी व नमुनेदार उदाहरण समोर आले असून त्यामुळे एका आदिवासी बाळंतीण महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
त्याचे झाले असे की,सदर महिला हि कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील मूळ रहिवासी असून तिचे काही वर्षांपूर्वी निफाड तालुक्यातील वडाळी येथील तरुणाशी लग्न झाले होते.ती नुकतीच आपल्या माहेरी बाळंतपणासाठी आली होती.तिचे दिवस भरल्याने तिला जवळचे चासनळी येथील प्राथमिक उपचार केंद्र येथे नेले असता त्या ठिकाणी दवाखान्यात कर्तव्यावर असलेले आरोपी डॉ.साहिल त्र्यंबक खोत,डॉ.साक्षी कैलास सेठी आदी आपल्या कर्तव्यावर हजर नव्हते.परिणामस्वरूप तिला वेळेवर उपचार मिळाले नाही.तर तेथील रुग्णवाहिका चालक संजय शिंदे याने आपल्या रुग्णवाहिकेत पुरेसे इंधन भरून ठेवले नाही त्यामुळे तिला अन्यत्र उपचारार्थ नेता आले नाही परिणामी तिचा उपचाराभावी मोठा रक्तस्राव होऊन मृत्यू झाला आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.दरम्यान या प्रकरणी या परिसरातील नागरिकांनी या आरोग्य व्यवस्थेचा निषेध व्यक्त केला आहे.व संबधित वैद्यकीय इसमावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्यामुळे वरील तीन आरोपींवर कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास भास्करराव घोलप (वय-४८) यांनी वरील तिन्ही आरोपीवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३९३/२०२३ भा.द.वि.कलम ३०४(अ)१६६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे.पुढील तपास शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक देसले हे करत आहेत.
COMMENTS