Homeताज्या बातम्याक्रीडा

राजस्थानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर !

कोलकाता प्रतिनिधी- यशस्वीने केकेआरच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूपासून प्रहार केला. यशस्वीच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला केकेआरवर ९

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा
अंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी सगामच्या पाच विद्यार्थ्यांची निवड
आयपीएलमध्ये पहिल्यांदा कर्णधार बनलेल्या सूर्यकुमारला मोठा फटका

कोलकाता प्रतिनिधी- यशस्वीने केकेआरच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूपासून प्रहार केला. यशस्वीच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला केकेआरवर ९ विकेट्स राखून दणदणीत विजय साकारता आला. केकेआरने राजस्थानपुढे १५० धावांचे आव्हान ठेवले होते. यशस्वीच्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने ते सहजपणे पूर्ण केले. कारण या विजयासह राजस्थानने मुंबई इंडियन्सला धक्का देत गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबईचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरला आहे.  राजस्थान रॉयल्सने आजच्या विजयानंतर Point Table मध्ये मुंबई इंडियन्सला मागे ढकलून तिसऱ्या स्थानी झेप घेतली. १२ सामन्यातील RRचा हा सहावा विजय ठरला अन् १२ गुण व +०.६३३ नेट रन रेटसह त्यांनी तिसऱ्या स्थानी झेप घेतली. मुंबईचे ११ सामन्यांत १२ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट हा -०.२५५ असा आहे. गुजरात टायटन्स ( १६) व चेन्नई सुपर किंग्स ( १५) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांना प्ले ऑफमधील स्थान पक्क करण्यासाठी एक विजय पुरेसा आहे. तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी कडवी टक्कर आहे. ११ गुणांसह लखनौ सुपर जायंट्सही या शर्यतीत आहेत. कालच्या पराभवाने कोलकाता नाइट रायडर्स ( १२ सामने ५ विजय ७ पराभव १० गुण) ९५ टक्के प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स यांचेही प्रत्येकी १० गुण आहेत, परंतु त्यांच्या हातात ३ सामने अजून आहेत. दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद याचे आव्हान केव्हाच संपल्यात जमा आहे.

COMMENTS