Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रहारच्या मदतीने मिळाले निराधार महिलेस घरकुल

कोपरगाव शहर प्रतिनिधी - कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील आदिवासी समाजाच्या निराधार महिलेस प्रहार संघटनेच्या मदतीने घरकुल मंजूर झाल्याने सदर महिल

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण? | LOKNews24
टेलर दुकानाला भीषण आग ; साडेचार लाखांचे नुकसान
तळेगाव-मळेला नागरीकांची केली कोरोना तपासणी

कोपरगाव शहर प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील आदिवासी समाजाच्या निराधार महिलेस प्रहार संघटनेच्या मदतीने घरकुल मंजूर झाल्याने सदर महिलेने प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍याचे आभार व्यक्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, करंजी येथील मंगल आहेर या 49 वर्षीय निराधार आदिवासी महिलेस राहण्यासाठी स्वतःचे हक्काचे घर नसल्याने ती गावातील मंदिरामध्ये राहत होती. आदिवासी असून तीचाकडे स्वतःचा जातीचा दाखला नसल्याने अनेक वेळा शासकीय कार्यालयाचे उंबरे झिजून देखील तिला शासकीय योजनेत घरकुल मिळत न्हवते त्यामुळे मोठ्या हाल अपेष्टा सहन करत ती आपले जीवन जगत होती. ही माहिती प्रहार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांना समजताच त्यांनी तत्काळ त्या आदिवासी महिलेचे भेट घेत सविस्तर माहिती घेतली व शासकीय दरबारी जातीचा दाखला मिळविण्यासाठी आपल्या प्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍या सोबत प्रयत्न करत तिला जातीचा दाखला मिळवून दिला होता. या जातीच्या दाखल्या मुळे त्या निराधार महिलेस नुकतेच घरकुल देखील मंजूर झाले असून त्याचे काम देखील प्रगतीपथावर सुरू आहे अशी माहिती प्रहार चे संजय शिंदे यांनी दिली. सदर आदिवासी महिलेस जातीचा दाखला व घरकुल मिळवून देण्यास प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष संजय शिंदे, संदीप क्षीरसागर, कराळे सर, दिनेश शेळके,वसंत काळे,नितीन भन्साळी आदींनी अथक प्रयत्न केले या बद्दल त्या महिलेने सर्वांचे आभार व्यक्त केले.

COMMENTS