Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी पत्रकार संघाच्या मदतीने पोखरी तलाव परिसरातील शेती होणार गाळयुक्त

दिड तास थांबून जिल्हाधिकार्‍याने केली पहाणी

बीड प्रतिनिधी - शासनाच्या गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार अंतर्गत पोखरी ता बीड येथील साठवण तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी दीपा मुध

Aurangabad : एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा थेट उच्च न्यायालयात (Video)
पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे उपाय…| LOKNews24
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी 8 आरोपींना पोलीस कोठडी

बीड प्रतिनिधी – शासनाच्या गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार अंतर्गत पोखरी ता बीड येथील साठवण तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शेतकर्‍यांना मोफत गाळ काढून देण्यात येणार आहे आज जिल्हाधिकारी यांनी तब्ब्ल दिड तास थांबून किती वेळात ट्रक्टर भरते कोणत्या शेतात जाते याची प्रत्यक्ष पहाणी केली नागरिकांनी या कामात लोकसहभाग आधीक वाढवण्याचे आवाहन केले .
गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत लोकसहभागातून हि कामे करण्यासाठी सामाजिक संस्था व्यक्ती यांनी पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर  मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आदेशाने बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी पुढाकार घेतला त्याला जिल्हाधिकारी यांनी सहमती दर्शवली होती त्यानुसार आज पोखरी येथील तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तहसीलदार सुहास हजारे मंडळ अधिकारी बांगर तलाठी पोकळे  बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे विभागीय संघटक सुभाष चौरे ,राज्य प्रसिद्ध प्रमुख अनिल महाजन परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके,पत्रकार हल्ला विरोधी समितीचे अध्यक्ष साहस अदोडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय हांगे यांच्यासह गावचे सरपंच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी तब्ब्ल दिड तास थांबून एक जेसीबी किती वेळात किती गाळाचे ट्रक्टर भरले जाते याची पहाणी केली शिवाय शेतात कशा पद्धतीने गाळ टाकला जातो याची प्रत्यक्ष शेतात जाऊन पहाणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नागरिक शेतकर्‍यांना लोकसहभाग वाढवण्याचे आवाहन केले.

COMMENTS