Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे

नाना पटोले यांची होणार गच्छंती ?

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसमध्ये सर्व काही आलबेल नसून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्याविरूद्ध अंतर्गतच नाराजीच

डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारापूर्वी आढळले जिवंत
विवस्त्र करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक
न्यायाचा लढा प्रत्येक अत्याचारात हवा !

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र प्रदेश काँगे्रसमध्ये सर्व काही आलबेल नसून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्याविरूद्ध अंतर्गतच नाराजीचा सूर असून अनेक कार्यकर्त्यांनी हायकमांडच्या भेटी घेत प्रदेशाध्यक्ष हटावची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलांचे वारे वेगाने वाहत आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांची कंबर कसली आहे. सर्वच पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर पक्षातही अंतर्गत बदल करताना दिसत आहेत. आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांना प्रदेशाध्यपदावरून हटवण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न होत असल्याचे दिसून आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील मुंबई दौर्‍यावर येत आहेत. पाटील या दोन दिवसांच्या दौर्‍यात राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. विदर्भातील नेत्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांआधी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाचा विचार करताना जातीय समीकरण देखील लक्षात घेतलं जाऊ शकते. दलीत चेहरा मुंबई काँग्रेससाठी दिल्याने आता मराठा किंवा ओबीसी नेत्याचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचार केला जाऊ शकतो. काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा नेत्याची गरज आहे जो आगामी निवडणुकीत यशस्वी काम करुन दाखवेल. तसेच पक्षातील गटबाजी थांबवू शकेल अशा नेत्याची काँग्रेसला सध्या गरज आहे. याशिवाय सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणे, महविकास आघाडी होत असल्याने देश पातळीवर विरोधक एकत्र येत असताना राज्यातही ते समन्वय ठेवणारा नेता काँग्रेसला प्रदेशाध्यपदी हवा आहे.

COMMENTS