Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रसला नवसंजीवनी मिळेल का ?

भारता जोडो यात्रेनंतर काँगे्रसने पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवननी देण्यासाठी एका नव्या यात्रेची घोषणा केली आहे. खरंतर भारत जोडो यात्रेनंतर नुकत्याच

प्रदूषणाची वाढती पातळी
राजकारणातील मूल्ये आणि नैतिकता
मराठा-ओबीसी संघर्षाचा नवा अध्याय

भारता जोडो यात्रेनंतर काँगे्रसने पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवननी देण्यासाठी एका नव्या यात्रेची घोषणा केली आहे. खरंतर भारत जोडो यात्रेनंतर नुकत्याच पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर भारत जोडो यात्रेचा काँगे्रसला कितपत फायदा झाला हा प्रश्‍न उपस्थित होतो. काँगे्रस कुठे कमी पडतेय, त्यांची रणनीती काय असायला हवी, यावर विचारमंथन होतांना दिसून येत नाही. काँगे्रसच्या भारत जोडो यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तो काँगे्रसला मतांमध्ये परावर्तित करता आलेला नाही. खरंतर राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये काँगे्रसची सत्ता होती, तरी काँगे्रस या राज्यांमध्ये पराभूत झाली. दोन राज्ये हातातून गेल्यानंतर तेलंगणासारखे राज्यात काँगे्रस सत्तेत आली. त्यामुळे काँगे्रस मायनसमध्ये गेल्याचे दिसून येत आहे. याउलट भाजपने मध्यप्रदेशमध्ये असलेली सत्ता तर राखलीच, याउलट राजस्थान आणि छत्तीसगड काँगे्रसच्या हातून भाजपने हिसकावून घेतले आहे. बरं याठिकाणी अटीतटीचा सामना झाला असेही म्हणता येत नाही, कारण काँगे्रसचा सपशेल पराभव याठिकाणी झाला. त्यामुळे काँगे्रस भारत जोडो यात्रेनंतर पुन्हा एकदा भारत न्याय यात्रा काढणार आहे. ही यात्रा मणिपूर ते मुंबई अशी असणार आहे. भारत जोडोपेक्षाही ही यात्रा अधिक लांबींची असणार आहे. . राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेत 14 राज्यांमधील तब्बल 85 जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. हा मोर्चा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्‍चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात असा 6 हजार 200 किलोमीटरचा प्रवास करेल. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे 14 जानेवारीला मणिपूरमधून या यात्रेला सुरुवात करतील. भारत जोडो यात्रेने 4 हजार 500 किलोमीटर प्रवास केला होता. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्व प्राप्त होतांना दिसून येत आहे. तरीही  मुद्दा असा आहे की, देशामध्ये काँगे्रस ज्या यात्रा काढत आहे, त्याचा निवडणुकीमध्ये कितपत फायदा होणार आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत, अशावेळी काँगे्रसने महत्वाच्या 10-15 राज्यांवर आपला फोकस करणे अपेक्षित होते. तिथे विशेष रणनीती आखून उमेदवारांना बळ देण्याचा, सत्ताधार्‍यांचे कच्चे दुवे शोधण्याचा प्रयत्न करून वार करण्याची खरी गरज होती. मात्र काँगे्रस त्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. याउलट काँगे्रस जिथे डोके वर काढायला लागली की, तिथे सत्ताधारी आपला हुकमाचा एक्का असलेले तपास यंत्रणांना कामाला लावून टाकतात, त्यामुळे विरोधकांची शक्ती तपासयंत्रणांशी तोंड देतांना खर्ची होते, अशावेळी सत्ताधारी आपली वेळ बरोबर साधून घेतात, त्यामुळे विरोधकांनी ज्या आक्रमकतेने तोंड द्यायला पाहिजे, ते देतांना ते घाबरतांना दिसून येत आहे. काँगे्रसचे अनेक नेते तुरुंगात जाण्यापासून घाबरतांना दिसून येत आहे. त्यामुळे काँगे्रस मनातून पुरता घाबरलेला आहे. काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी त्यांना डरो मतचा मंत्र दिला असला तरी, तो मंत्र काँगे्रस नेते अवलंबतांना दिसून येत नाही. परिणामी काँगे्रसचे खच्चीकरण होतांना दिसून येत आहे. काँगे्रसचा किल्ला राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे लढवू शकत नाही. तर काँगे्रसला हा किल्ला सामुदायिकरित्या लढावा लागणार आहे. कारण काँगे्रसजवळ लोकनेत्यांची उणीव आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या त्या राज्यांमध्ये काँगे्रसजवळ लोकनेते होते. त्यांची जनमानसावर प्रचंड पकड होती. संपूर्ण राज्य ते आपल्या ताब्यात ठेवण्याची किमया लिलया करू शकत होते. मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे काँगे्रसने सामुहिकपणे लढा देण्याची गरज आहे. सत्ताधारी तपासयंत्रणांच्या जोरावर नेत्यांना तुरुंगात डांबण्याचा, तुमचे खच्चीकरण करण्याचा, संपत्ती जप्त करण्याचा कार्यक्रम राबवेल, मात्र या संपूर्ण बाबींना न भीती काँगे्रसने आक्रमकतेने पुढे येण्याची गरज आहे. मात्र ती आक्रमकता काँगे्रस नेत्यांची हरवलेली आहे, त्यामुळे काँगे्रस बॅकफूटवर जातांना दिसून येत आहे. त्यामुळे या नव्या यात्रेमुळे काँगे्रसला कितपत नवसंजीवनी मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे. 

COMMENTS