Homeताज्या बातम्या

काँगे्रसचे विचारमंथन तारेल का ?

प्रतिकूल परिस्थितीमध्ये विजय मिळवणारा खरा योद्धा असतो. मात्र अनुकूल परिस्थिती असतांना देखील पाय गाळून पराभव स्वीकारणारा हा योद्धा नसतोच. खरंतर हे

राष्ट्रवादी विरोधक एकसंघ ठेवणे भाजपासाठी कसरत : निशिकांत पाटील यांना स्वकीयांचाच अडथळा
पुणे महापालिकेकडून चार दिवस पाणी कपात मागे
युद्धाला जाण्याआधी युक्रेनच्या बाप-मुलीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल | LOKNews24

प्रतिकूल परिस्थितीमध्ये विजय मिळवणारा खरा योद्धा असतो. मात्र अनुकूल परिस्थिती असतांना देखील पाय गाळून पराभव स्वीकारणारा हा योद्धा नसतोच. खरंतर हे वर्णन एका योद्धाचे असले तरी काँगे्रसला ते आपसूकच लागू पडते. कारण नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सर्व काही अनुकूल वातावरण असतांना देखील काँगे्रसचा पराभव झाला. त्यामुळे योद्धा म्हणून काँगे्रस अजूनही परिपक्व झाल्याचे दिसून येत नाही. मात्र यानिमित्ताने एक महत्वाची बाब म्हणावी लागेल की, यानिमित्ताने काँगे्रसने प्रामुख्याने राहुल गांधी यांनी विचारमंथन केले असून, त्यासंदर्भात एक समिती नेमली आहे. त्या समितीच्या अहवालावर चर्चा होणार असल्याचे दिसून येत आहे. या पराभवाचे खरे कारण राहुल गांधी यांना कळल्याचे दिसून येत आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँगे्रस नेत्यांनी पक्षाला दुय्यम दर्जा देत, आपले हित जोपासल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विधानातून काँग्रेसची सध्यस्थिती लक्षात येते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 2014 पर्यंत काँगे्रस कधीही इतका बॅकफूटवर गेला नव्हता. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या ह्यातीत देखील काँगे्रस काही वर्ष सत्तेवर नव्हता, मात्र त्यामुळे काँगे्रसचा पराभव संपला नव्हता. मात्र 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुका बघितल्या तर काँगे्रसचा करिश्मा संपल्यागत दिसून येत होता. काँगे्रसमधील नेतेच पक्षविरोधी भूमिका घेवू लागले होते. त्यामुळे काँगे्रसमध्ये बदल करण्याची आवश्यकता भासू लागली होती. त्यानंतर पक्षाध्यक्ष म्हणून मल्लिकार्जून खरगे यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि त्याचबरोबर राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे काँगे्रसला खर्‍या अर्थाने संजीवनी मिळाली. मात्र काँगे्रसने जे सरंजामी नेते तयार केले आहे, त्यांच्यामुळे काँगे्रस रसातळाला गेली, हा खरा अन्वयार्थ राहुल गांधी यांना कळून चुकला होता. खरंतर ज्याप्रमाणे देशाचा विचार केल्यास आपण देशहित प्रथम बघतो, त्याचप्रमाणे राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपले हित दुय्यमस्थानी ठेवत पक्षहित प्रथम समोर ठेवण्याची गरज होती, मात्र ती गरज काँगे्रस नेत्यांमध्ये दिसून आली नाही. त्यामुळे काँगे्रसचा हलगर्जीपणा सातत्याने दिसून आला. त्यामुळेच हरियाणात काँगे्रसचा पराभव झाला असेच म्हणावे लागते. हरियाणामध्ये अनुकूल वातावरण असतांना काँगे्रसमधील अंतर्गत दुफळी या पराभवाला खरी जबाबदार आहे. त्यामुळेच हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने दोन तास आत्मपरीक्षण केले. हरियाणाचा पराभव गांभीर्याने घेत पक्षाने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला जी वस्तुस्थितीवर आधारित अहवाल देईल. या बैठकीत राहुल गांधी यांनी निवडणुकीदरम्यान पक्षाच्या नेत्यांनी आपले हित सर्वोपरि ठेवल्याबद्दल आणि पक्षाला दुय्यम दर्जावर ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. खरंतर काँगे्रसने अनेक जिल्ह्यात, तालुक्यात आणि राज्यात सरंजामदारी नेतृत्व उभे केले आहे. आणि भाजपने सर्वप्रथम या सरंजामी नेतृत्व हटवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात मग ईडी, सीबीआय या सर्वच तपासयंत्रणेद्वारे सरंजामी नेत्यांना खिळखिळे करून ठेवले आहे. त्यामुळे सरंजामी नेतृत्व प्रस्थापित भाजपसमोर कठोर भूमिका घेण्यास घाबरते. त्यामुळे काँगे्रससोबत सच्च्या दिलाने काम करणारे नेते कमी होतांना दिसून येत आहे. त्यातच काँग्रेसला अंतर्गत गटबाजी नवी नाही. सत्तेच्या काळात या गटबाजीचे प्रदर्शन फार होत नाही. सत्ता त्यावर उतारा असतो आणि गटबाजी थांबविता येते; परंतु सत्ता नसली, की पक्षश्रेष्ठींचा दरारही कमी होतो. त्यांच्याविरोधातील बंडाला धार येते. काँग्रेसमध्ये सध्या त्याचा अनुभव येत असतो. नेत्यांना संघटनेत आणि सत्तेत कितीही वाटा दिला, तरी त्यांचे समधान होत नसते. त्यामुळे हरियाणा सारख्या राज्यात सत्ता मिळवता येत असतांना देखील त्यांनी ती सत्ता सोडून दिली ती केवळ गटबाजीमुळेच.

COMMENTS