Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार : पालकमंत्री

पुणे प्रतिनिधी - पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट स्थापन केल्यास आणि त्यामार्फत अर्ज एकत्रित केल्यास दानशूर व्यक्तींकडून मदत

नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी सूचना मागविण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश
चंद्रकांतदादांची क्षमता पैशात मोजता येणार नाही… त्यांनी राज्यात १०५ आमदार निवडून आणले…
शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

पुणे प्रतिनिधी – पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट स्थापन केल्यास आणि त्यामार्फत अर्ज एकत्रित केल्यास दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भरता निधी अर्थात स्वनिधी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मनपा आयुक्त विक्रमकुमार, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव राहुल कपूर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर उपस्थित होते.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेचे अभिनंदन करून पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पथविक्रेत्यांनी एकत्रितपणे वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास कमी किमतीत खरेदी होईल. त्यामुळे मिळणारे उत्पन्न वाढविता येईल. सुरुवातीच्या खरेदीसाठी निधी उभारण्यातांना लोकप्रतिनिधी मदत करतील. पुढच्या आठवड्यात प्रलंबित अर्जाबाबत बँक प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात येईल. पथविक्रेत्यांसाठी नियुक्त शासकीय समिती आणि महानगरपालिकेने एकत्रित बसून पथविक्रेत्यांसंदर्भातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा.
कोविड संकटकाळात पथविक्रेत्यांना सर्वाधिक हानी सहन करावी लागली. त्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वनिधी योजना सुरू केली, असे त्यांनी सांगितले.
श्री.कपूर म्हणाले, पाहिल्यावर्षी देशात 20 लाख पथविक्रेत्यांनी स्वनिधी योजनेचा लाभ घेतला. महाराष्ट्रात 45 टक्के आणि देशात 41 टक्के महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. रोजगारासाठी हे महत्वाचे क्षेत्र आहे. योजनेत सहभागी 90 टक्के लाभार्थी प्रथमच बँकिंग क्षेत्राशी जोडले गेले. देशात 5 हजार 600 कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले असून राज्यात 4 लाख 50 हजार पथविक्रेत्यांनी योजनेचा लाभ घेतला. अधिकाधिक पथविक्रेत्यांपर्यंत योजना पोहोचावी, असे आवाहन त्यांनी केले.
आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, दोन वर्षांपूर्वी पथविक्रेत्यांना सहकार्य करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. विक्रेत्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करून त्यांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. शहराचा विस्तार लक्षात घेता 3 हजार पथविक्रेत्यांना नव्याने परवाना देण्यात येईल. विमाननगर येथे हॉकर्स पार्क उभारण्यात येत असून शहरात 15 ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. बँकांनी प्रलंबित अर्जाना लवकर मान्यता द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात श्री.उदास म्हणाले, पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत पुणे शहरात 46 हजार 77 अर्ज प्राप्त झाले असून 17 हजार 752 पथविक्रेत्यांना 21 कोटी 80 लाखाचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून पथविक्रेत्यांचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पथविक्रेत्यांना धनादेश आणि परिचय फलकाचे वितरण करण्यात आले. चांगली कामगिरी करणारे अधिकारी, बँकेचे प्रतिनिधी आणि पथविक्रेत्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डिजिटल व्यवहारासाठी प्रातिनिधिक स्वरूपात क्यूआर कोडचे वाटपही यावेळी करण्यात आले. प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या स्टॉलला भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला.

COMMENTS