Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाहू महाराज छत्रपती लढणार लोकसभा ?

कोल्हापूरसाठी शरद पवारांची खास रणनीती

कोल्हापूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा क

आमदार प्रणिती शिंदेंनी पंतप्रधानांना पाठवलं पोस्टकार्ड
‘वंचित’चा ‘मविआ’सोबत अधिकृत काडीमोड
जळगावातील अपघातात तिघांचा मृत्यू

कोल्हापूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करत, सभा घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच तेथील कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरूवात केली आहे. बीडमध्ये नुकत्याच झालेल्या सभेमुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यानंतर पवारांनी आपला मोर्चा कोल्हापुराकडे वळवत आगामी लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून थेट शाहू महाराज छत्रपती यांनाच उतरविण्याची रणनीती आखण्यात येत आहे.
शरद पवारांच्या दौर्‍यांमध्ये कोल्हापुरातील सभेचे अध्यक्षस्थान थेट शाहू महाराज यांनी स्वीकारलेले होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडून येणार्‍या लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शाहू महाराज यांना संधी मिळणार का ? अशी चर्चा कोल्हापूरात रंगली आहे. संपूर्ण देशाला लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच राष्ट्रवादीत फूट पडली. राष्ट्रवादीला पुन्हा सावरण्यासाठी शरद पवार यांनी महाराष्ट्राचा झंजावाती दौरा सुरू केलेला आहे. येत्या शुक्रवारी (ता. 25) कोल्हापुरात शरद पवार यांची जाहीर सभा होत असताना या सभेचे अध्यक्षस्थान थेट श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी स्वीकारले आहे. यातून त्यांनी आगामी राजकीय दिशाच स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. या पूर्वीच अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला होता. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नेते कोल्हापुरातून त्यांच्या उमेदवारी साठी प्रयत्न करत असताना महाराजांच्या भूमिकेने आघाडीच्या नेत्यांच्या प्रयत्नाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार हे राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची 25 ऑगस्टला कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. या सभेचे अध्यक्षस्थान श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे भुषविणार आहेत. पवार आणि छत्रपती घराण्याचे अतिशय चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीच्या राजकीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारत त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रयत्नाला बळ दिल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूर लोकसभेसाठी यांच्या नावाची चर्चा – महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभेसाठी काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, बाजीराव खाडे, राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी. पाटील, शिवसेनेचे संजय घाटगे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी यातील अनेकजण लोकसभेसाठी इच्छूक नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सध्या खासदार संजय मंडलिक आणि अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची नावे चर्चेत आहेत. मात्र शाहू महाराज छत्रपती यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी स्वीकारल्यास येथील विजय सोपा होईल असे बोलले जात आहे.  

COMMENTS