मुंबई: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक घटस्फोट घेणार आहेत. दोघांचा निर्णय नक्की झाला आहे. या पार्श्वभूमीवर प
मुंबई: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक घटस्फोट घेणार आहेत. दोघांचा निर्णय नक्की झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी वृत्तवाहिनी जियो न्यूजनं महत्त्वाचं वृत्त दिलं आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक अधिकृतपणे तलाकची घोषणा करतील. विविध कार्यक्रमांसाठी केलेले करार आणि कायदेशीर बाबींमुळे दोघांनी घटस्फोटाबद्दल अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. शोएब आणि सानिया यांचे अनेक व्यावसायिक आहेत. ते पूर्ण करायचे आहेत, असं वृत्त जियो न्यूजनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. सानिया आणि शोएबनं त्यांचा मुलगा इजहान मिर्झा मलिकच्या संगोपनासाठी को-पॅरेंटिंगचा निर्णय घेतल्याची माहितीदेखील दिली आहे. सानियानं इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. त्यात तिनं नारंगी रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. फोटो कॅप्शनमध्ये सानियानं पेड इमोजी वापरला आहे. या फोटोला १.७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.सानिया मिर्झाच्या इन्स्टाग्राम पोस्टनं घटस्फोटाच्या वृत्तांना बळ मिळालं आहे. गेल्या आठवड्यात तिनं मुलगा इजहानसोबत एक फोटो शेअर केला होता. ‘ते क्षण जे मला सर्वात वाईट दिवसांत घेऊन जातात,’ असे शब्द सानियानं हा फोटो शेअर करताना वापरले होते. सानियानं एक स्टोरीदेखील शेअर केली होती. दुभंगलेल्यांनी मनांनी कुठे जावं, त्यांनी अल्लाहकडे जावं, असं त्यात सानियानं म्हटलं होतं.शोएबनं विश्वासघात केल्यानं घटस्फोट घेण्याची वेळ आल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या वर्षी शोएबनं आएशा उमरसोबत बोल्ड फोटोशूट केलं होतं. यानंतर आएशा आणि शोएबचं नाव जोडलं गेलं. क्रिकेटर असल्यानं मला मॉडेलिंगबद्दल माहिती नव्हती. मात्र आएशानं मला खूप मदत केली, असं मलिक म्हणाला होता. आएशाबद्दल पत्नी सानियानं काय म्हटलं, असा प्रश्न मलिकला विचारण्यात आला. त्यावर सानियानं कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याचं मलिकनं सांगितलं. शोएब आणि आएशाच्या वाढत्या वाढत्या जवळिकीमुळेच सानिया आणि शोएबच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातं.
COMMENTS