Homeताज्या बातम्याशहरं

एकरक्कमी एफआरफी शिवाय उसाचे कांडके तोडू देणार नाही : माजी खा. राजू शेट्टी; काटामारी बंद करण्याची मागणी

आघाडीचा प्रयोग फसला : माजी खा. राजू शेट्टीइस्लामपूर पालिकेच्या निवडणुकी संदर्भात माजी खा.राजू शेट्टी यांना प्रश्‍न विचारला असता मागील निवडणुकीत आ

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने थांबवली
देर आये दुरुस्त आये : ना. बाळासाहेब पाटील
केळी उत्पादक शेतकऱ्यांना भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा : कृषीमंत्री दादाजी भुसे


आघाडीचा प्रयोग फसला : माजी खा. राजू शेट्टी
इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकी संदर्भात माजी खा.राजू शेट्टी यांना प्रश्‍न विचारला असता मागील निवडणुकीत आम्ही केलेला आघाडीचा प्रयोग फसला आहे, असे उत्तर दिले. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जर निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक असतील तर त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेवू.

इस्लामपूर / प्रतिनिधी : आगामी गळीत हंगामात एकरक्कमी एफआरफी तसेच मागील हंगामातील वाढीव 200 रूपयेसह साखर कारखान्यांनी काटामारी थांबवावी अन्यथा उसाचे कांडके तोडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
इस्लामपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
माजी खा. शेट्टी म्हणाले, सांगली जिल्हयातील दालमिया साखर कारखाना वगळता इतर साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी दिली नाही. उस दर कायदा 1966 नुसार या कारखान्यांनी त्या रक्कमेवर 15 टक्के व्याज दिले पाहिजे. सध्या साखर कारखान्यांची पाची बोटे तुपात आहेत. केंद्र सरकारने साखरेचा 3100 रूपये दर निश्‍चित केला आहे. सध्या तो दर 3200 ते 3400 च्या आसपास आहे. निर्यात केलेल्या साखरेला ही भाव मिळत आहे. इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत असताना हे कारखाने दर देवू शकत नाहीत. राज्यातील 200 साखर कारखाने हे काटामारी करत आहेत. या काटामारीतून मिळालेला उस हा रात्रीत गाळप करून. ती साखर रात्रीत बिगर पावतीची व्यापार्‍यांना विकली जाते. यातून हे कारखाने कोटयावधी रूपये मिळवत आहेत. यासाठी पेट्रोल-डिझेल पंपावर जेसे ऑनलाईन काटे असतात. तसे या कारखान्यांवरती बसवावेत. यातून लुट थांबेल. सध्या काही कारखाने हे बिगर सभासदांच्या ठेवी ही घेत आहेत. अशा ठेवी घेणे हे बेकायदेशीर आहे. जर बीगर सभासदांनी आमच्या ठेवी परत देण्याची मागणी केली तर ती त्यांना परत करावी लागेल. तसेच काही कारखाने पाणी पुरवठ्याच्या नावाखाली सभासदांची लूट करत आहेत. पाणी पुरवठा संस्था चालवण्यासाठी अक्कल लागत नाही.

COMMENTS