Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्लीश्‍वेरासमोर कदापी झुकणार नाही ः खा. सुप्रिया सुळे

पाथर्डी/प्रतिनिधी ः सध्याच्या सरकारकडे पक्ष फोडायला पैसे आहेत पण नांदेडच्या हॉस्पिटलमधील गरीब पोरांना औषध देण्यासाठी पैसा नाही, साठ लोकं दगावली त

सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर विखे पाटील यांचं उत्तर
राज्यात दुष्काळ जाहीर करा ः सुप्रिया सुळे
चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नाही नेसत ? – सुप्रिया सुळे

पाथर्डी/प्रतिनिधी ः सध्याच्या सरकारकडे पक्ष फोडायला पैसे आहेत पण नांदेडच्या हॉस्पिटलमधील गरीब पोरांना औषध देण्यासाठी पैसा नाही, साठ लोकं दगावली तरी क्लीन चिट देणार्‍या सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी. भारतात एक अदृश्य शक्ती असून तिने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांना अडचणीत आणले, देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होते त्यांना हाफ उपमुख्यमंत्री केले. आमच्यासमोर कितीही अडचणी उभ्या केल्या तरी, आम्ही दिल्लीश्‍वेरासमोर झुकणार नाही, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी संस्कार भवन मध्ये प्रताप ढाकणे व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या परिसंवाद या कार्यक्रमाप्रसंगी केले. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहीणी खडसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवा आघाडीचे संदिप वर्पे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत म्हस्के, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, शेवगाव तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, अ‍ॅड शारदा लगड, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवशंकर राजळे, आदिसह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना सुळे यांनी म्हटले की, नाशिकमध्ये उशिरा का होईना चव्हाण साहेबांची आठवण झाली. चव्हाण साहेब फक्त माझे नाहीये जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली तेव्हा या महाराष्ट्राचा सह्याद्री हा भारताच्या मदतीला गेलेला आहे, हे आमच्या चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. चव्हाण साहेबांचा फोटो लावलाय त्यांना माझी विनंती आहे की, चव्हाण साहेबांचे पुस्तक वाचून बघा आणि त्याचे राजकीय मत जाणून घेतल्यानंतर तुम्हाला त्यांचा फोटो लावायचा अधिकार आहे का? याचा विचार करा असा सल्लाही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला. तसेच चांगल्या बसेस उपलब्ध करून दिल्या जातील असा पाच कलमी कार्यक्रम राबवला जाईल. तसेच उस तोडणी कामगारांची मुदत पाच ऐवजी तीन वर्षाची करण्यासंबंधीची मागणी शरद पवार साहेबांना कळवू, कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदारेश्‍वरचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, सूत्रसंचालन गणेश सरोदे तर आभार योगेश रासने यांनी मानले.

घुले परिवार कोणत्या गटात – शेवगाव पाथर्डी मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यासह माजी सभापती क्षितिज घुले असे घुले परिवाराचे कोणीही सदस्य कार्यक्रमाला हजर नसल्याने घुले परिवार कोणत्या गटात आहेत हा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे.

ऊसतोडणी कामगारांचे प्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य – ऊसतोडीणी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी पंकजा मुंडे या अनेक वेळा पवार साहेबांना भेटायाच्या. त्यात आम्ही कधी राजकारण आणलं नाही. निवडणूकीच्या वेळी टोकाची भूमिका घेऊ पण जेव्हा आपल्या ऊसतोडणी कामगारांचा विषय असेल तेव्हा पंकजाताईंचा मान सन्मान आम्ही नेहमीच केलेला आहे. ऊसतोडणी कामगारांचे प्रश्‍न सोडवण्याला प्राधान्य देवू. मला खरंच पंकजा मुंडे यांच्याबद्दल प्रेम वाटत याचं कारण असं की ती एकटी लढते. ज्या पक्षाला 95 साली प्रमोद महाजन आणि गोपीनाथजी मुंडे या दोन लोकांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या विरोधात रान पेटवत  सत्तेत आणलं. आज काय पद्धतीने तो पक्ष त्यांच्या मुलींना वागवतोय. तुम्हाला जमत नसेल तर मोठी बहीण म्हणून मी करीन. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे मराठमोळी नेत्यांनी दोघांनी दिल्ली गाजवली हे आपल्याला नाकारून चालणार नाही. भारतीय जनता पक्ष ते विसरल्याचा आरोप सुळे यांनी केला.

COMMENTS