Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुष्ठ रुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ करणार : मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १९ : राज्यात कुष्ठ रुग्णांच्या रुग्णालयीन सेवा व पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. या स्वयंसेवी संस्थांना शासन प्रति मह

स्कूल  व्हॅन उलटून सहा विद्यार्थी जखमी
इलेक्ट्रिक वाहनांवरील कराला आ. सत्यजीत तांबेंचा विरोध
केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटींची मदत देणार


मुंबई, दि. १९ : राज्यात कुष्ठ रुग्णांच्या रुग्णालयीन सेवा व पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. या स्वयंसेवी संस्थांना शासन प्रति महिना प्रति कुष्ठरुग्ण याप्रमाणे अनुदान देत असते. रुग्णालय तत्वावरील स्वयंसेवी संस्थांना प्रति कुष्ठरुग्ण दरमहा ६ हजार २०० रुपये आणि पुनर्वसन तत्वावरील स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रती कुष्ठरुग्ण रुपये ६ हजार इतके अनुदान शासनाकडून वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

राज्यात कुष्ठरोग निर्मूलनबाबत सदस्य डॉ नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरी, सुलभा खोडके यांनीही सहभाग घेतला.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, सध्या रुग्णालय तत्त्वावरील संस्थांना दरमहा प्रती कुष्ठ रुग्ण रुपये २ हजार २०० रुपये आणि पुनर्वसन तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रति कुष्ठरुग्ण रुपये २ हजार इतके अनुदान शासनाकडून देण्यात येते. यामध्ये वाढ करण्यात येत आहे. कुष्ठरोग निर्मूलन मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच कुष्ठ रुग्णांच्या रुग्णसेवेसाठी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीचे आयोजनही करण्यात येईल. या बैठकीत संस्थांच्या अडचणी, मोहिमेतील उणिवा आणि सूचना जाणून घेण्यात येतील.

राज्यात अती जोखमीच्या लोकसंख्येत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अर्थात कुसुम ही मोहीम सन २०२३ पासून दरवर्षी राबविण्यात येत आहे. कुष्ठरोगाविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानही राबविण्यात येते. राज्यातील आरोग्य विभागाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम यांची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. राज्यातील कुष्ठरोगाचे सर्वेक्षण वाढल्यामुळेच रुग्णसंख्या वाढलेली दिसून येत आहे. या सर्व रुग्णांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्यात आले आहे, असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री अबिटकर यांनी सांगितले.

COMMENTS