Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार ः मुख्यमंत्री शिंदे

शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

पुणे ः मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात ओबोसी समाजाच्या आरक

पावसामुळे यंत्रणांनी सतर्क रहावे ः मुख्यमंत्री शिंदे
प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा ः मुख्यमंत्री शिंदे
उद्योग, परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल ः मुख्यमंत्री शिंदे

पुणे ः मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात ओबोसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्स सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाकिस्तानकडे तलवार रोखून धरणारा पुतळा पाहून माझ्या अंगात उर्जा संचारली. त्या पुतळ्याकडे पाहून पाकिस्तानची कधीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच लवकरच लंडनच्या वस्तुसंग्रहालयातील शिवरायांची वाघनखं भारतामध्ये आणली जाणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर शिवछत्रपती जेवढे धार्मिक तेवढेच विज्ञाननिष्ठ होते. महाराजांनी धर्म किंवा पंथ यांचा विचार न करता स्वराज्य स्थापन केले. छत्रपती म्हणजे नियतीला पडलेले सुंदर स्वप्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलाच्या झेंड्यावर शिवाजी महाराजांचे शिल्प लावले. आम्ही जमेल तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करत असतो. युनोस्कोमधे अकरा गड किल्ल्यांची नोंद झाली ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी दांडपट्टा हा राज्याचा खेळ म्हणून जाहीर केला, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

किल्ल्यांच्या विकासातील अडथळे दूर होणार ः फडणवीस – शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले. अन्याय करणारा कितीही मोठा असो देव देश आणि धर्मासाठी लढणारा जिंकतो. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढायला शिकवले. आम्हीही शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करतोय. पुरातत्व विभागाच्या कामांच्या पद्धतीमुळेच गड किल्यांच्या विकासाला अडथळा येतो. मात्र, यामधे बदल करण्यात आल्याने हा अडथळा आता दूर होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

गडकिल्ल्यांच्या जीर्णोद्धारासाठी 83 कोटींचा खर्च ः अजित पवार – शिवाजी महाराज म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन जाणारा विचार. सर्व जाती, धर्मांना एकत्र करून गुलामगिरीच्या विरोधात लढले पाहिजे हे शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनावर बिंबवले. महायुती सरकार गड-किल्ल्यांसाठी काम करत आहे. गडासाठी 83 कोटी खर्च करण्यात आले आहेत. याबरोबरच इतर गडकिल्ल्यांच्या जीर्णोद्धार करण्याचे काम करण्याची सूचना मला मुख्यमंत्र्यांनी केली असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण .- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे ’शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र ’शिवाई देवराई’ विकसित करण्यात आली आहे. देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

COMMENTS