Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार ः मुख्यमंत्री शिंदे

मुंबई ः मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तीव्र होतांना दिसून येत असून, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली 24 डिसेंबरची मुदत काही दिवसांवर येऊन ठेपली अ

आरक्षणासंदर्भात सकारात्मक चर्चा ः मुख्यमंत्री शिंदे  
उद्योग, परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल ः मुख्यमंत्री शिंदे
मराठवाडा समृद्ध व्हावा हाच ध्यास ः मुख्यमंत्री शिंदे

मुंबई ः मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तीव्र होतांना दिसून येत असून, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली 24 डिसेंबरची मुदत काही दिवसांवर येऊन ठेपली असतांना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार असल्याचे वक्तव्य रविवारी केले आहे. ‘डीप क्लीनिंग ड्राइव्ह’ मोहिमेत घाटकोपरमध्ये सहभाग घेतल्यानंतर ते बोलत होते.
यावर बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकारचे धोरण आणि भूमिकाही स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. कुठल्याही इतर किंवा ओबीसी समाजाचा आरक्षण कमी न करता, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहोत. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या धारावी बचाव मोहीम या मोर्चावर टीका केली. कालचा मोर्चा हा विकास विरोधी मोर्चा होता. धारावी आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी आहे. त्या ठिकाणी लोक कसे राहतात? कोणत्या परिस्थितीत राहतात? त्यांचे जीवन उंचावले पाहिजे, त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत ही भूमिका सरकारची आहे. यापूर्वी सॅकेलिंग नावाचा कॉन्ट्रॅक्टर होता. त्याचे कॉन्ट्रॅक्ट का रद्द केले? जर का यांना अदानीला विरोध होता. तर यांनी सॅकेलिंगचे कॉन्ट्रॅक्ट का रद्द केले, असा प्रश्‍न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ’’त्या कॉन्ट्रॅक्टर सोबतच्या काही तडजोडी असतील त्या तुटल्या असतील, ज्यामुळे हे सगळे घडत आहे, असेही विधान केले आहे. सरकार संपूर्ण धारावीकरांच्या पाठिशी उभे असून आमचे सरकार धारावीकरांना न्याय देणार असे शिंदे म्हणाले. तर ते पूर्णपणे विकासाच्या विरोधी आहेत. यांनी प्रत्येक वेळी आरे कारशेड, समृद्धी महामार्गाचे काम, मेट्रोचे काम आणि विकासाचे प्रकल्प थांबविण्याचे काम केले आहे’, अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे. पण आमचे सरकार धारावीकरांना न्याय देणारे आहे. यामध्ये कोणत्याही एका व्यक्तीचा फायदा होणार नसल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

COMMENTS