Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गिरीश महाजन होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?

मुंबई :महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अवघ्या काही तासांवर येवून ठेपला आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आपल्या जुन्या नेत्यांवर पक्षाची

पथनाट्यातून जनजागृती; संगमनेर परिषद व संगमनेर महाविद्यालयाचा उपक्रम
अन्यथा आणखी एका फाळणीस देशाला सामोरे जावे लागेल : माजी मंत्री अण्णा डांगे
ऊस आणि पिळवणूक

मुंबई :महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अवघ्या काही तासांवर येवून ठेपला आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आपल्या जुन्या नेत्यांवर पक्षाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष असून, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावर गिरीश महाजन यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.
भाजपचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन ओळखले जातात. अशावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी गिरीश महाजन यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS