Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहित्य संमेलनाबाबत अपेक्षा पूर्ण करीन : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : पुण्याने देशामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि साहित्याची भूमी अशी पुण्याची ओळख आहे. व

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.
जम्मू-काश्मिरमधील प्रश्‍न प्रलंबितच
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा गोळीबार

पुणे : पुण्याने देशामध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि साहित्याची भूमी अशी पुण्याची ओळख आहे. विचारांची-इतिहासाची वारसा असलेली ही भूमी आहे. संमेलनाच्या सरकार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळताना मी कुणी साहित्यिक अथवा अभ्यासक या भूमिकेतून कार्य करणार नसून, मी एक कार्यकर्ता या भूमिकेतून जबाबदारीच्या जाणिवेने, आत्मीयता जपत पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करीन, अशी ग्वाही केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
सरहद, पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पुण्यातील संपर्क कार्यालय साहित्य परिषदेत सुरू करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

COMMENTS