पाच राज्यातील निवडणुकांनंतर इंधन महागणार ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच राज्यातील निवडणुकांनंतर इंधन महागणार ?

पेट्रोल-डिझेलमध्ये 5 ते 6 रुपयांनी होणार दरवाढ

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः युक्रेन आणि रशियामधील तणाव आगामी काही दिवसांत इंधन दरवाढीस कारणीभूत ठरू शकतो. युक्रेन आणि रशियामधील वाढता तणावामुळे जागतिक पात

बारामतीचा गड उद्धवस्त करणे इतके सोपे नाही.
देशात तिसर्‍या आघाडीची शक्यता नाही ः पटनाईक
अकोल्यात मराठी शिक्षक कार्यशाळा उत्साहात

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः युक्रेन आणि रशियामधील तणाव आगामी काही दिवसांत इंधन दरवाढीस कारणीभूत ठरू शकतो. युक्रेन आणि रशियामधील वाढता तणावामुळे जागतिक पातळीवर इंधनांच्या किंमती भडकू शकतात. पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी ओलांडली असून, सर्वसामान्यांचा संताप होत असतांनाच, पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा महागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत नाहीत. याचा परिणाम तेल कंपन्यांच्या उत्पन्नावर होत आहे. निवडणुकीनंतर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे 5 ते 6 रुपयांनी वाढ करू शकतात, असा इशारा तत्ज्ञांनी दिला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न झाल्याने कंपन्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत प्रतिलिटर पाच ते सहा रुपयांनी दरवाढ करणे आवश्यक झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चढत्या राहिल्या तर, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नक्कीच वाढतील. प्रबल सेन यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल एक डॉलरने वाढली, तर देशांतर्गत बाजारात किंमत प्रतिलिटर 45-47 पैशांनी वाढते. मात्र परदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी दिवाळीपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. नोव्हेंबरपासून कच्चे तेल प्रति बॅरल 25 डॉलरवर वर पोहोचले आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम असल्याने आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती मंगळवारी 94 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. 2014 नंतर पहिल्यांदाच क्रूडच्या किमतीने एवढी पातळी गाठली आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम राहिल्यास कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 125 डॉलरपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS