Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करणार : मंत्री दिलीप वळसे पाटलांची ग्वाही

पुणे / प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागासह अन्य भागात रविवारी (ता. 26) दुपारी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. कांदे, बटाटा, वाटाणा या

शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांनी दिल्या कृषि उद्योजकांच्या प्रकल्पांना भेटी
अखेर खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाकडून फायबर बोटीची व्यवस्था
कराड शहरातील वखारीला मध्यरात्री भीषण आग

पुणे / प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागासह अन्य भागात रविवारी (ता. 26) दुपारी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. कांदे, बटाटा, वाटाणा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाही पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे केले जातील.

शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम मिळवून देण्यासाठी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. वळसे-पाटील यांनी पुण्याचे नियोजित दौरा रद्द करून सोमवारी (ता. 27) कुरवंडी, भावडी, थूगाव, कारेगाव या परिसरात शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी उपस्थित असलेले आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांतअधिकारी गोविंद शिंदे, तहासिलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ, सहाय्यक निबंधक (सहकार) विठ्ठल सूर्यवंशी यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे व जिल्हाधिकारी पुणे यांना अहवाल सादर करण्याचे आदेश वळसे पाटील यांनी दिले.

वळसे पाटील म्हणाले, राज्याच्या अनेक भागात गारपीट व मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाबरोबरच मोठ्या आकाराच्या गारा पडल्या त्यामुळे पिकांची पाने गळून पडली आहेत. काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहेत. वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार अजूनही पाऊस पडण्याची शक्यता आहे. आलेल्या नैसर्गिक संकटातून शेतकर्‍यांना सावरण्यासाठी राज्य सरकार मदत करणार आहे.

COMMENTS