Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीस होणार राज्याचे नवे कारभारी ?

मुंबई :राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल सहा दिवसांचा कालावधी उलटला तरी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही.

भव्य दिंडीचे तिसगांवहुन त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान 
कार्ती चिदंबरम यांची 11.4 कोटींची मालमत्ता जप्त
ललित पाटील प्रकरणाचे वास्तव! 

मुंबई :राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल सहा दिवसांचा कालावधी उलटला तरी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. बुधवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जो घेईल तो आपल्याला आणि आपल्या पक्षाला मान्य असेल असे जाहीर करून देवेंद्र फडणवीसांचा मार्ग सुकर केल्याचे बोलले जात होते. गुरूवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक झाली, यात राज्याचे नवे कारभारी फडणवीस होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. मात्र त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे किंवा केंद्रात मंत्री व्हावे असा सल्ला दिला होता. मात्र हा सल्ला शिंदे यांनी फेटाळून लावत, श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे आणि एकनाथ शिंदे यांना महायुतीचे संयोजकपद देण्याची मागणी केली होती. भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या मागणीवर सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांची किंवा दादा भुसे यांची उपमुख्यमंत्री वर्णी लागण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे केंद्रीय राजकारणात असून, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव नाही. शिवाय मुलाला पुढे केल्यामुळे वेगळा संदेश शिवसेनेच्या नेत्यांत जावू शकतो, त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदी ज्येष्ठ नेत्याला संधी देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळेच दादा भुसे यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते असे बोलले जात आहे. मात्र यासंदर्भात अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महायुतीचा 21-12-10 चा फॉर्म्युला
सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच महायुतीमध्ये मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेतून 21-12-10 असा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. त्यानुसार, भाजपला सर्वाधिक 21, शिवसेनेला 12 व राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा देखील होणार विस्तार
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद देण्यात येईल. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, शिवसेना शिंदे गटालाही आणखी एक मंत्रिपद केंद्रात दिले जाणार आहे. त्यानुसार, खासदार श्रीकांत शिंदे हे मंत्री होतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

COMMENTS