Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा चिरून हत्या

मुलासमोर खून केल्यानंतर पती चंदननगर पोलिस ठाण्यात हजर

पुणे/प्रतिनिधी ः पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून कौटुंबिक वादातून महिलेच्या गळ्यावर पतीने चाकुने वार केल्याची घटना खराडी भागात घडली आहे. महिले

मेव्हण्याकडून दाजीची डोक्यात रॉड घालत हत्या
एकलहरे दरोड्यात पत्नीनेच केला पतीची गळा आवळून खून
कोयत्याने हल्ला करत केली तरुणाची हत्या

पुणे/प्रतिनिधी ः पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून कौटुंबिक वादातून महिलेच्या गळ्यावर पतीने चाकुने वार केल्याची घटना खराडी भागात घडली आहे. महिलेचा खून करुन पती चंदननगर पोलिस ठाण्यात हजर झाला. लक्ष्मी केशव सीताफळे (वय -40, रा. लेबर कॅम्प, पाटीलबुवानगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी लक्ष्मीचा पती केशव भीमराव सीताफळे (वय 45) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित सिताफळे दांपत्य हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून कामाच्या निमित्ताने मागील आठ ते दहा वर्षापासून पुण्यात वास्तव्यास आलेले आहे मयत लक्ष्मी सीताफळे ही जुन्या भांड्याचे काम करत होती तर तिचा पती केशव सीताफळे हा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्यांना 12 वर्षाचा मुलगा देखील आहे. लक्ष्मी आणि पती केशव यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाले होते. केशवने पत्नीला शिवीगाळ करुन बुधवारी रात्री राहत्या घरात मुलासमोर तिचा गळा चाकुने चिरला. पत्नीचा खून करुन तो पोलिस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणाचा तपास चंदननगर पोलिसांकडून करण्यात आले आहे. खूनामागचे निश्‍चित कारण समजले नसून, प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून पतीने तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, आरोपी केशव सिताफळे यानी पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिचा घरातील सुरीने गळ्यावर वार करून तो थेट पोलिस ठाण्यात आला.माझ्या पत्नीला रागाच्या भरात चाकूने मारले असून तिला दवाखान्यात घेऊन चला अशी विनवणी त्यानी पोलिसांकडे केली. त्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी गेले असता, संबंधित महिला मयत आढळून आली. त्यामुळे रुग्णवाहिकेतून तिचा मृतदेह शिवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

COMMENTS