Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नीचा गळा चिरला, मग उकळते तेल टाकले; चारित्र्याच्या संशयावरून केली हत्या

लातूर प्रतिनिधी - चारित्र्याच्या संशयावरून शिक्षकाने पत्नीचा कत्तीने गळा चिरला, हातावर व पाठीवर सपासप वार केले. त्यानंतर उकळते तेल अंगावर टाकून न

पुण्यात गाडी घासल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
मेव्हण्याकडून दाजीची डोक्यात रॉड घालत हत्या
तुर्भेत वडापाव विक्रेत्याकडून रिक्षा चालकाची हत्या

लातूर प्रतिनिधी – चारित्र्याच्या संशयावरून शिक्षकाने पत्नीचा कत्तीने गळा चिरला, हातावर व पाठीवर सपासप वार केले. त्यानंतर उकळते तेल अंगावर टाकून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना अहमदपुरात घडली. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हालसी (ता. निलंगा) येथील वैजनाथ दत्तात्रय सूर्यवंशी (43) हा शिक्षक खंडाळी (ता. अहमदपूर) येथील जिल्हा परिषद शाळेत आहे. अहमदपुरात तो पत्नी शामल (वय 35), 11 आणि 9 वर्षांच्या दोन मुलींसह वास्तव्याला होता. काही दिवसांपूर्वी त्याने मोठी मुलगी छत्रपती संभाजीनगरला भावाकडे शिक्षणासाठी पाठविली होती. सध्या घरात पती-पत्नी व 9 वर्षांची मुलगी राहत होते.  वैजनाथ पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यामध्ये वाद होत असत. सततच्या मारहाणीने त्रस्त पत्नी यापूर्वी तक्रार देण्यासाठी पोलिसात गेली होती. मात्र, नातेवाइकांनी समजूत काढल्यानंतर तिने तक्रार मागे घेतली होती. त्यानंतरही दोघांमधील वाद सुरुच राहिले.

COMMENTS