जालना प्रतिनिधी/ गॅस स्फोटाचा बनाव करून पत्नीने वकील पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आ
जालना प्रतिनिधी/ गॅस स्फोटाचा बनाव करून पत्नीने वकील पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड किरण लोखंडे असं हत्या करण्यात आलेल्या वकिलाचं नाव असून मनीषा लोखंडे असं हत्या करणाऱ्या पत्नीचं नाव आहे. दोन साथीदारांच्या मदतीने आरोपी पत्नीने पतीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयताच्या पत्नीसह दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS