धक्कादायक ! विधवा लेकीला बापाकडून मारहाण.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक ! विधवा लेकीला बापाकडून मारहाण.

जमिनीच्या पैशाच्या वादातून घडली घटना.

यवतमाळ  प्रतिनिधी- शेतीच्या पैशातून वडील आणि विधवा मुलीमध्ये झालेल्या वादातून बापाने मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ(Yavatmal) मधील

पुतळा हटवण्यावरुन झालेल्या वादातून दुकानदाराला मारहाण;घटना CCTV मध्ये कैद.
दोन विद्यार्थिनी कोचिंगमधून बाहेर पडताच रस्त्यावर भिडल्या
विकलेली जमीन परत मिळवून दे म्हणून मध्यस्थास मारहाण

यवतमाळ  प्रतिनिधी- शेतीच्या पैशातून वडील आणि विधवा मुलीमध्ये झालेल्या वादातून बापाने मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ(Yavatmal) मधील आर्णी तहसील(Arni Tehsil) मध्ये घडली आहे. वडील आपली साडे चार एकर जमीन विकत होते. मुलीला याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुलगी पैसे मागण्यासाठी तहसिल कार्यालयात पोहचली. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली. याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर बेदम मारहाणीत झाले. यावेळी वडिलांनी विधवा मुलीला बेदम मारहाण केली. उज्वला नंदू कालापाड(Ujwala Nandu Kalapad) असे विधवा मुलीचे नाव आहे, तर देवराव तुकाराम धनगर(Devrao Tukaram Dhangar) असे वडिलांचे नाव आहे. 

COMMENTS