Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी का नाही ?

माजी मंत्री बच्चू कडू यांचा थेट सवाल

मुंबई ः महाराष्ट्रासह विविध राज्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या छाप्यामुळे खळबळ उडाली असतांना, माजी मंत्री बच्चू कडू यांनी आतापर्यंत भाजप

जांभा बु.च्या १०० टक्के पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा – पालकमंत्री बच्चू कडू
आजकाल तृतीयपंथीयही आमदार होतात
शरद पवार भाजपचा गेम करतील अशी अवस्था

मुंबई ः महाराष्ट्रासह विविध राज्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या छाप्यामुळे खळबळ उडाली असतांना, माजी मंत्री बच्चू कडू यांनी आतापर्यंत भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी का होत नाही? असा सवाल केला आहे. समाजाला हुशार करण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची असते. पण राजकीय नेते चुकले तर ताळ्यावर आणले पाहिजे. जे काही सत्य आहे, ते तुम्ही मांडले पाहिजे. राजकीय नेते रुसले तर तुमचे काहीच बरे-वाईट होत नाही. तुमच्यामागे ईडीची चौकशीही लागू शकत नाही. ईडी लागणार नाही, अशाप्रकारे काम करत राहा, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आता भाजपसोबत आहे. पण भाजपवाल्यांना माझा सरळ प्रश्‍न आहे. ईडीने भाजपाच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही? त्यांनी याचे उत्तर द्यायला हवे. एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्‍न पडतो. ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट किंवा काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी केली जाते. पण भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी होत नाही. शिंदे गटाच्या नेत्यांमागे ईडीची चौकशी सुरू होती, पण ते आता सत्तेत आले आहेत, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.  दरम्यान, मराठा आरक्षणावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या मुदतीवरूनही एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे. यावर बोलताना, मनोज जरांगे पाटील सरकारला मुदत वाढवून देऊ शकतात. मराठा आरक्षणाबाबत सरकारने 15 दिवसांचा प्रगती अहवाल दाखवावा. मग मनोज जरांगे यांच्यासोबत बैठक घ्यावी. काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असे मनोज जरांगे यांना वाटले, तरच ते वेळ वाढवून देतील, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.

COMMENTS