Homeताज्या बातम्यासंपादकीय

अदानी स्पष्टीकरण का देता हेत ? 

 देशातील दोन प्रमुख उद्योजकांपैकी एक आणि आशियात श्रीमंतीत पहिलें स्थान तर जगातील अव्वल तिघांमध्ये असणारे गौतम अदानी यांनी काल एका वाहिनीला मुलाखत

जगाच्या आर्थिक व्यवस्थेतील सामाजिकता !
सरकारच्या समितीला सर्वोच्च न्यायालयात नकार ! 
शह-प्रतिशह !  

 देशातील दोन प्रमुख उद्योजकांपैकी एक आणि आशियात श्रीमंतीत पहिलें स्थान तर जगातील अव्वल तिघांमध्ये असणारे गौतम अदानी यांनी काल एका वाहिनीला मुलाखत देताना आपले मौन सोडले. खरेतर, एवढ्या आघाडीच्या उद्योजकाची मुलाखत ही अशावेळी झालीय की, देशातील जनतेचे मन त्यांच्याविषयी बरेचसे कलुषित झाले आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे देशातील सार्वजनिक उद्योगांना ते आपल्या ताब्यात घेत सुटले आहेत. परंतु, त्यांचा गैरसमज असा झालाय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असणाऱ्या जवळीकीमुळे त्यांना टिकेचे लक्ष्य व्हावे लागते आहे. मुळातच, एखाद्या विषयाचे स्पष्टीकरण देण्याची गरज जेव्हा निर्माण होते, तेव्हा त्याविषयी होणाऱ्या आरोपांमध्ये काहीतरी तथ्य असते, असा एक सार्वजनिक प्रवाद आहे. गौतम अदानी यांनी अशावेळी आपले मौन सोडले जेव्हा त्यांना एखादा सार्वजनिक उद्योग हातात घेताना पहिल्यांदा प्रचंड विरोध केला गेला आहे. हा विरोध महाराष्ट्रात झाला. नुकतेच ४,५,६ जानेवारी असा सलग तीन दिवस महाराष्ट्रात विद्युत कर्मचारी अधिकाऱ्यांनी संप पुकारला होता. हा संप इतका यशस्वी झाला की, राज्य सरकारने मेस्मा कायद्यानुसार कारवाई करण्याची भीती दाखवल्यानंतर देखील संप विस्कळीत झाला नाही. एवढेच नव्हे तर, जर सरकारने विद्युत वितरण कंपनी अदानी किंवा खाजगी भांडवलदारांना देण्याचा निर्णय बदलला नाही, तर बेमुदत संप पुकारण्याचेही आवाहन कर्मचारी संघटनांनी केले आहे. याचा दुसरा अर्थ असा की, देशात अदानी यांनी एखाद्या सार्वजनिक उद्योग हातात घेण्याविरोधात एवढा विरोध पाहिला. अर्थात, यापूर्वी केंद्र सरकारने आणलेल्या शेतकऱ्यांसंदर्भातील तीन कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन खरेतर, अदानी यांच्या विरोधात देखील होते. कारण, त्यांचे अतिभव्य उभारले जाणारे शीतगृहे यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. परंतु, वीज कर्मचाऱ्यांसारखा त्यात थेट अदानी यांना झळ पोहचली नव्हती. परंतु, महाराष्ट्रात झालेल्या संपामुळे त्यांना विद्युत वितरण कंपनी हातात घेण्यास अडचण निर्माण झाली आहे. नाक दाबले की तोंड उघडते, तसा हा प्रकार आहे. अदानी यांच्या म्हणण्यानुसार केवळ मेहनत आणि मेहनत हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. तर, संपूर्ण जगाने मेहनतीपासून कोरोना काळात सक्तीची विश्रांती घेत असल्याच्या काळात त्यांचा नफा मात्र सारखा वाढत राहीला, अशी माहिती नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. अर्थात, उद्योजक किंवा कोणत्याही क्षेत्रातील यशस्वी लोकांची कार्यशैली ही सर्वसामान्यांपेक्षा वेगळी असते, हे मान्य केले तरी कोरोना काळात जगातील सर्वच उद्योग आणि उद्योजकांची पिछेहाट झाली; परंतु, भारतात अदानी आणि अंबानी यांच्या व्यवसायात मात्र नफा वाढला. हे गणित अदानी यांनी मेहनतीने समजवायला हवे होते. असो. अदानी यांनी त्यांच्या व्यवसायाची वाढ राजीव गांधी यांच्या काळातच सुरू झाल्याचे सांगून अप्रत्यक्ष मोर्चा वेगवेगळ्या बाजूंनी वळवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या ‌‌‌‌‌‌पश्चिम बंगाल पासून तर राजस्थान घ्या गहलोत सरकारपर्यंत आपले सर्वच पक्षांच्या सरकारांशी चांगले संबंध असल्याचे सांगत, ज्या बावीस राज्यांमध्ये आपला व्यवसाय विस्तार आहे, तेथे भाजपचेच सरकार आहे, असे नाही. राहुल गांधी यांना देखील त्यांनी विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व संबोधले आहे. त्यांच्या या मुलाखतीचा निष्कर्ष असा निघतो की, देशाच्या जनतेचा विरोध पत्करणे जोखमीचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. याचा दुसरा अर्थ केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय हवाही बदलत असल्याचे तर हे संकेत नाहीत ना?

COMMENTS