कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं ?

सध्या देशभरात सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय वातावरण खराब झालेले आहे. थंडीच्या लाटेने व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्वांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे. य

सत्ता केंद्रीकरणाचा धोका
एसटीचा तिढा सुटणार का ?
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा

सध्या देशभरात सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय वातावरण खराब झालेले आहे. थंडीच्या लाटेने व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्वांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे. यामुळे विविध आजाराने जसे वर डोके काढले आहे तशेच आपल्या देशात सामाजिक आणि राजकीय खराब वातावरणामुळे अनेकांवर परिणाम झालेला आहे. राजकीय परिणामाची हवा सध्या देशात जोराची सुरु असून आरोप- प्रत्यारोपाच्या या वातावरणात सर्वच राजकीय पक्ष सध्या बाधित झालेले आहेत. या थंडीच्या वातावरणात आपल्या देशाचे पंतप्रधान अंगावर शाल घेऊन संसदेत भाषण करतांना आपण सर्वचजण त्यांना पाहत आहोत. पण मोदींच्या अंगातील थंडी हि नैसर्गिक नसून ती कृत्रिम आहे हे मात्र नक्की. मोदीसारखी शाल सरसंघचालक मोहन भागवत यांना घेण्याची गरज नाही हे विशेष. दुसरे विशेष हे कि, टाटाचे मालक रतन टाटा यांना सरकारने एअर इंडिया विकल्यामुळे त्यांच्यात कमालीची असणे साहजिकच. एअर इंडिया विकणे हा तसा दुर्दैवी निर्णय. असे दुर्दैवी शेकडो निर्णय मोदी सरकारने घेतले आहेत. त्यावर सभागृह गरम करण्याअगोदर मोदींनी काँग्रेसवर सलग दोन दिवस टीका करून त्यांची हुडहुडी वाढवली. यात झाले असे कि, ज्या गंभीर प्रश्नावर सभागृहात चर्चा होणे अपेक्षित होते तसे झाले नाही. राज्यात शरद पवारांची स्तुती करून मोदीने शिवसेना आणि राज्यातील काँग्रेस यांच्या डोक्यावरचे केस उभे राहतील एवढे त्यांना गारठून टाकले आहे. मोदी सरकारच्या या कृत्रिम थंडीचा परिणाम भारत देशातील उद्योगपती, राज्यकर्ते आणि धनिक सोडता सर्वांवर झाला आहे. त्यात पुन्हा सध्या सुरु असलेल्या गोवा, उत्तरप्रदेश राज्याच्या निवडणुकीत हवा भरण्यासाठी आणि ओबीसी, व इतर वंचित, सेक्युलर लोकांना समाधानी करण्यासाठी मोहन भागवत यांनी धर्मसंसदेतील निर्णय अमान्य केल्याचे वक्तव्य याच कडाक्याच्या थंडीतले. आता यावर विरोधकाला अंगात गर्मी आणण्यासाठी घ्यावे लागणारे घोंगडे घेता आले नाही हे वेगळे. हे नुसते थंडीपुरते मर्यादित कधीच नसते. ते पावसाळ्यात देखील असते. तेव्हा तर सभागृहातील पाणी प्रचंड गढूळ केलेले असते. हे गढूळ पाणी आणि कडाक्याची थंडी भारतीय लोकांना पाचवीला पुजलेली. या प्रक्रियेत गरिबांची लाल परी थांबलेली असते आणि टाटांचे एअर इंडिया सुसाट असते हे वास्तव.
आता आपल्या लोकशाहीत असे का होते? तर याला सर्वच लोक जबाबदार आहेत. किंबहुना भारतातील लोकांना खरी लोकशाही आणि खरे स्वातंत्र्य कळलेच नाही म्हणा कि त्यांना ते पचत नाही म्हणा. तशी भारतीय लोकांना गुलामीत राहण्याची प्रचंड सवय आहे. त्यांना स्वातंत्र्याची किंवा ते उपभोगण्याची भीती वाटते हे नक्की. आता अशा लोकांना कितीही स्वातंत्र्य दिले काय आणि अधिकार दिले काय… ते कशासोबत खायचे हेच माहित नसल्यामुळे सगळा गोंधळ होतो. तो निवडणुकीत आपण पाहतो. दोन दिवसांच्या पाचशे- हजार रुपये, दारू, मटण यासाठी अमूल्य मतदान लोक विकतात. बरं ते विकायचे तर विकूद्या.  पण ते अशा माणसाला विकू नये की, तो पुठे देशचं विकली. आता आपल्या देशाचे जे राजकीय चित्र आहे त्यावर बसपाचे संस्थापक कांशीरामजी म्हणतात की, ‘ एक नागनाथ है और दुसरा सापनाथ ‘ ( भाजप- काँग्रेस ) आता सध्या केंद्रातील सत्ता आहे नागनाथ यांच्याकडे. ती दिली लोकांनी. (मतदान मशीन घोटाळा हा आपला विषय नाही.)  आता या नागाचं वय वाढलंय. तो मोठा झालाय. आता बोंबलण्यात काय अर्थ? यावर एक छान गीताची ओळ आठवली. ‘कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं? नागाच्या पिलाला तू का गं खवळीलं?’ आता ‘ढवळलंय नं पाणी, तर पाहा की, किती गढूळ झालंय, साचलंय. त्यात काय- काय उगलय.  आता जरा त्याला वाहतं करणं अपेक्षित. निर्मळ पाणी जसं झऱ्यात आणण्यासाठी गढूळ उपसावे लागते तसे. पण या संसदरूपी झऱ्यात स्वच्छ, निर्मळ आणि वंचित घटकातील माणूस पाठवायचा अधिकार ज्या बाबासाहेबांनी दिला तो विकायला दिला नाही तर स्वाभिमानाने जगायला दिला आहे हे लक्षात ठेवणे क्रमप्राप्त. लोकशाही हि जीवनप्रणाली आहे हे घटनाकारांनी सांगितले आहे हे लक्षात ठेवा. नसता हिवाळा- पावसाळा, नागनाथ- सापनाथ आहेत. 

COMMENTS